दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.12-तालुक्यातील जरंडी येथील महात्मा फुले विद्यायलतील मुलींचे दोन शौचालय व पाच मूत्रालय अज्ञातांनी सोमवारी सकाळी नऊ वाजता जे सी बी च्या साहाय्याने पाडले याप्रकरणी संस्थेचे मुख्याध्यापक सुभाष पाटील यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात चार ते पाच संशयिताविरुद्ध सायंकाळी चार वाजता फिर्याद दिली आहे यामध्ये सिल्लोड तालुक्यातील जंजाळा येथील जे सी बी मालकांचा संशयितामध्ये समावेश आहे.
जरंडी गावाच्या बाहेर पाचवी ते दहावी इयत्ता शिक्षण घेण्यासाठी सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान संचालित महात्मा फुले विद्यालय आहे या विद्यालयाच्या आवारात मुलींसाठी दोन शौचालय व पाच मूत्रालय उभारण्यात आले होते. अज्ञातांनी सोमवारी सकाळी नऊ वाजता जे सी बी मशिन लावून सदर शौचालय व मूत्रालय पाडले असून संबंधिता मध्ये व संस्था चालकामध्ये जागेचा न्यायालयीन वाद सुरू असल्याचे बोलले जाते यावरून हा प्रकार घडला आहे दरम्यान याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही.
----पोलिसांच्या रडारवर जे सी बी मालक
दरम्यान घटनेतील संशयित सिल्लोड तालुक्यातील जंजाळा येथील जे सी बी मालक असून पोलीस त्या जे सी बी चालक चा व मालकाचा शोध घेत आहे.
(बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव)
0 Comments