शिर्डीत दुबई येथील एका साईभक्ताने सुमारे 24 लाख आठशे रुपयांचे सुवर्णातील आकर्षक नक्षीकाम केलेले ॐ साई हे नाव साईचरणी केले अर्पण!

शिर्डी (प्रतिनिधी) संपूर्ण विश्वाला श्रद्धा सबुरी आणि सर्व धर्म समभावाची शिकवण देणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डी येथे साई दर्शनाला मोठ्या संख्येने साईभक्त नेहमी येत असतात.व  श्री साईबाबांच्या चरणी श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव भरभरून दान देत असतात. असेच आपल्या श्रद्धेपोटी एका साईभक्ताने श्री साईबाबांच्या चरणी श्रद्धा व्यक्त करण्यासाठी ओम साई या सुवर्ण अक्षराचे दान दिले आहे.

  सोमवार दिनांक १२ मे २०२५ रोजी दुबई येथील एका साईभक्ताने २७० ग्रॅम वजनाचे, आकर्षक नक्षीकाम असलेले सुवर्णातील "ॐ साई" हे नाव श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केले. या सुवर्ण दानाची किंमत चोवीस लाख आठशे चाळीस रुपये असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर  यांनी दिली.
सदर सुवर्ण "ॐ साई" नाव संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्याकडे सुपुर्द केल्यानंतर द्वारकामाई येथे बसविण्यात आले. श्री द्वारकामाईत साईबाबांचे संपूर्ण जीवन गेले. अशा या द्वारकामाईत बाबा ज्या ठिकाणी उभे राहत होते. तेथे श्रद्धा सबुरीच्या वर ओम साई हे सुवर्ण अक्षराचे नाव लावण्यात आले आहे. हे दान दिल्यानंतर या देणगीदार साई भक्ताचा साईसंस्थानच्या वतीने  सत्कार करण्यात आला. देणगीदार साई भक्ताने आपले नाव गुपित ठेवण्याचे यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments