साडेतीन हजार किलो केशर आंबे साई भक्त करगळ बंधू कडून साई चरणी अर्पण...



शिर्डी..राजेंद्र दूनबळे.

साईभक्त श्री रवि नारायण करगळ बंधु, रा.चव्हाणवाडी (नारायणबाग) ता. शिरूर जि. पुणे यांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी ३ हजार ५०० किलो केशर आंबे श्री साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिले असल्‍याबाबतची माहिती श्री साईबाबा  संस्‍थानचे मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. आज मंगळवार दिनांक २७ मे २०२५ रोजी संस्‍थानच्‍या साई प्रसादालयात साईभक्‍तांच्या प्रसाद भोजनासाठी या आंब्‍यांच्‍या रसाचा समावेश करण्यात आला आहे असे सांगितले..

आज साई प्रसाद भोजनात या केशर आंब्याचा रस साई भक्तांना प्रसाद रुपी मिळणार आहे..साई बाबांचे भक्त हे कोणत्या न कोणत्या प्रकारे आपल्या साई बाबांना भर भरून दान देत असतात...

Post a Comment

0 Comments