बाभळेश्वर(वार्ताहर) राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे नुकतीच जेष्ठ नागरिक व समस्थ ग्रामस्थांच्या वतीने ऑपरेशन सिंदूर च्या समर्थनार्थ व भारतीय सैन्याच्या पराक्रमाबद्दल भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सेनेने दाखवलेल्या पराक्रमास सलाम आणि राष्ट्राच्या अखंडतेचा निर्धार व्यक्त करण्यासाठी ही रॅली निघाली. या रॅलीमध्ये भारत माता की जय, वंदे मातरम्, जय हिंद या घोषणांनी संपूर्ण बाभळेश्वर गाव देशभक्तीने भारले गेले. दहशतवादाविरोधात संताप आणि भारतीय सेनेबद्दल अभिमान व्यक्त करणारी ही रॅली म्हणजे एक सार्वजनिक जागृती नव्हे तर जनतेचा राष्ट्रासाठीचा
जागर होता. ही केवळ एक रॅली नव्हे तर प्रत्येक सामान्य नागरिकाच्या मनात देशप्रेमाची मशाल पेटवण्याचा निर्धार आहे.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती तुकाराम बेंद्रे, तान्हाजी बेंद्रे, आर.जे.गायत्री म्हस्के, निवृत्ती बनसोडे, प्राचार्य दीपक डेंगळे, लियाकत पठाण, शिवाजी बेंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी विकास सोसायटीचे चेअरमन दौलत बेंद्रे, अॅड.भास्कर पठारे, शंकरराव बेंद्रे, पत्रकार गोरख गवारे, बाळासाहेब बेंद्रे, ज्ञानदेव बेंद्रे, गोकुळ बेंद्रे, शंकरराव रोकडे, आण्णासाहेब काकडे, साहेबराव शिंदे, राजेंद्र गदिया, राजेंद्र म्हस्के, जमीर शेख, प्रकाश हुंडेकरी, गंगाधर बेंद्रे, आण्णासाहेब आरगडे, बबलू डहाळे, रमेश सोनवणे, रमेश दळे, गिरीश मोकाशी, पोपट वाकचौर, शिवा क्षीरसागर, ज्ञानदेव खोबरे, तुकाराम पाटील, सुरेश कडू, धोंडीराम दरेकर यांचेसह मोठ्या संखेने ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments