लोहगाव (वार्ताहर):
एच. एच. सी. बोर्ड परीक्षा २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून रयत शिक्षण संस्थेच्या प्रवरानगर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९७.३७ लागला आहे. विज्ञान शाखेत समर्थ सुभाष दळे ८१ टक्के प्रथम, सोहन वसंत पवार ८०.५० टक्के द्वितीय तर निकिता महेंद्र पगारे ७५.१७ टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे. तर कला शाखेत अनुप्रिया राहुल बनकर ५३.८३ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रावसाहेब म्हस्के, अरुण कडू पाटील, एकनाथराव घोगरे, माजी प्राचार्य बी.जी. आंधळे, प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपप्राचार्य अलका आहेर, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, पर्यवेक्षिका संगीता सांगळे यांच्यासह सर्व समिती सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments