दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.05- सोयगाव तालुक्यातील वरठाण येथील युवा कीर्तनकार भागवताचार्य ह.भ.प.सुदाम (महाराज) चिंधा सुर्यवंशी (वय 24) यांचे रविवारी मध्यरात्री 12 वाजुन 15 मिनिटांनी अल्पशा आजाराने निधन झाले. सोमवारी सकाळी दहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला.
ह.भ.प.सुदाम महाराज यांचे 12 वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांना भजनाची गोडी लागली त्यानंतर गावातील मंदीरावर हरीपाठ घेण्यात सुरवात केली. सहकारी सोबत कीर्तन जात कीर्तनाची गोडी निर्माण झाली काही दीवसानतंर युवा कीर्तनकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली मराठवाडासह खान्देश विदर्भात आदी ठिकाणच्या खेड्यापाड्यात वरठाण गावाचे नाव युवा कीर्तनकार सुदाम महाराज यांनी आपल्या वेगळ्याच शेलीत कीर्तन करीत नाव गाजविले होते युवा कीर्तनकार व उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून त्याना विविध ठिकाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कीर्तनापाठोपाठ समाजप्रबोधन, स्त्रीभ्रूणहत्या, ग्राम स्वच्छता अभियान,झाडे लावा झाडे जगवा असा उपदेश नेहमी आपल्या कीर्तनातून तसेच रील बनवुन देत असत
तसेच भागवत कथा देखील वाचन करीत होते अचानक गेल्या एक वर्षापूर्वी त्यांना कर्करोग आजाराने ग्रस्त झाले त्या दीवसापासुन त्यांच्यावर उपचार सुरू होते पण रविवारी मध्यरात्री 12 वाजुन 15 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली गेल्या सहा वर्षांपासून सुदाम महाराज कीर्तन करीत होते त्याच्या अत्यंत शांत व मनमिळावू स्वभाव तसेच सर्वाना चांगलाच उपदेश देणे व नेहमी भगवंतांचे स्मरण करणे अशी युवा कीर्तनकार महाराज यांचे ह्या अत्यंत दुःखद निधनाने वरठाण सह परीसरात शोककळा पसरली आहे. वरठाण येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर दि.05 सोमवार सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या अंत्ययात्रेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता त्यांच्या पश्चात आई, वडील,एक भाऊ,एक बहीण,असा परिवार आहे.
0 Comments