टाकळीभान : येथील परीसराचे आराध्य दैवत असलेल्या श्री महादेवाचा यात्रोत्सव सोमवार (दि.5) व मंगळवार (दि.6) असा दोन दिवस साजरा होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात्रोत्सवाची जय्यत तयारी झाली असल्याची ,माहिती यात्रा कमिटीने दिली आहे.
येथील श्री महादेवाचे मंदिर हे सुमारे सहाशे वर्षापुर्वीचे असून श्री महादेव हे भक्तांना अदभूत शक्ती देणारे असल्याचा अनेकांना प्रत्यय आलेला आहे. परदेशातील शिवभक्तांनी या मंदिराला भेट दिलेली आहे. येथील श्री महादेवाचा यात्रोत्सव वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षयतृतीया झाल्यावर जो पहिला सोमवार येईल. त्या सोमवारी यात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा रुढ झालेली आहे. यात्रा कमिटी महिनाभर आधी यात्रोत्सवाच्या कामाला लागलेली आसते. लोकवर्गणीतून हा संपुर्ण उत्सव साजरा होत असल्याने यात्रा कमिटी घरोघर फिरुन यथाशक्ती लोकवर्गणी गोळा करुन यात्रोत्सव दिमाखात पार पाडत असते.
यात्रोत्सवा निमित्त मंदिराची रंगरंगोटी करण्यात आलेली असून परीसर स्वच्छ करण्यात आला आहे. यात्रोत्सवा निमित्त सोमवारी (दि.5) सकाळी ६ ते ७वाजता गंगाजल मिरवणूक, सकाळी ७ ते ११ वाजता लघु रूद्राभिषेक, १२ वाजता दुग्धाभिषेक, रात्री ८ ते ९ वाजता शोभेच्या दारुची आतषबाजी, ग्रंथ मिरवणूक व छबिना, रात्री ९ ते १२ वाजता मालती इनामदार यांचा मोफत लोक नाट्य तमाशा होणार आहे. मंगळवारी (दि.6) सकाळी ८ ते १२ वाजता विविध कलाकारांचा हजेरीचा कार्यक्रम, दुपारी ४ ते ६ वाघ, नामांकित मुलांचा कुस्तीचा जंगी हंगामा रात्री ७ वाजता हिंदवी पाटील यांचा आर्केस्ट्रा होणार आहे, यात्रा उत्सव निमित्ताने मंदिराला आकर्षक विद्युत रोशन करण्यात आली आहे, यात्रा उत्सव भाविकांनी सहभागी होऊन, यात्रा उत्सव शांतता पार पाण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आव्हान यात्रा कमिटी केले आहे,
चौकट-
टाकळीभान येथील श्री महादेव मंदिर पुरातन असून मंदिराचे बांधकाम संपूर्ण दगडी असून मंदिराच्या आतील व बाहेरील बाजूस सुंदर कोरीव नक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या मुख्य गार्भायात भव्य, अशी श्री महादेवाची पिंड आहे. मागील बाजूस पार्वतीची मूर्ती आहे. समोरच्या गार्भायात भव्य कासव व उजव्या सोंडेच्या गणपतीची भव्य मूर्ती आहे. याच गार्भायात श्री विष्णूंनी घेतलेल्या विविध आवतारांच्या सुंदर मुर्ती कोरलेल्या आहेत. मनातील इच्छा पुर्ण करणारा महादेव म्हणून या श्रद्धास्थानाकडे पाहिले जाते. त्यामुळे यात्रेनिमित्त भाविक अवर्जुन येतात व श्री महादेवाच्या चरणी नतमस्तक होतात.
0 Comments