शिर्डी ( प्रतिनिधी) केंद्रीय जल शक्ती मंत्री ना. सी आर पाटील यांनी शुक्रवारी शिर्डीत येऊन श्री साईबाबा मंदिरात जाऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील,( मंत्री, जलसंधारण, महाराष्ट्र राज्य,) राज्यसभा खासदार धनंजय महाडीक व मा. आ. आशुतोष काळे आदी उपस्थित होते.
मा. ना. सी. आर. पाटील(, जल शक्ती मंत्री, भारत सरकार )यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा श्री साई मूर्ती व शाल देऊन सत्कार केला. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे उपस्थित होते. तत्पूर्वी श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ काकडी येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी.आर.पाटील व कोल्हापूर चे खासदार धनंजय महाडिक यांचे स्वागत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पा. आमदार आशुतोष काळे, विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कैलास नाना तांबे पाटील, आदींसह पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. शिर्डी विमानतळावरून ते शिर्डीत आले. साई दर्शन घेतले. साई दर्शना नंतर ते अस्तगाव येथे एका कार्यक्रमासाठी रवाना झाले.
0 Comments