साई आदर्शची आर्थिक वर्षात १ हजार २७९ कोटींची उलाढाल- शिवाजीराव कपाळे.

टाकळीभान प्रतिनिधी--साई आदर्श मल्टीस्टेटने २०२४ - २५ या आर्थिक वर्षांमध्ये १ हजार २७९ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल केली असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी दिली. पत्रकारांशी बोलताना शिवाजीराव कपाळे यांनी सांगितले, संस्थेने स्थापनेपासून पारदर्शक कारभार केला असल्याने संस्थेचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षांमध्ये संस्थेने सुमारे १२७९ कोटी रुपयांची उलाढाल केलेली आहे.

      ठेवीदारांनी मोठा विश्वास टाकल्याने १७० कोटी पर्यंत ठेवीचा पल्ला संस्थेने गाठला आहे. आर्थिक वर्षामध्ये हा आकडा नक्कीच २०० कोटींच्या पुढे जाईल याची आम्हाला खात्री आहे. संस्थेने १११ कोटी ६२ लाख रुपयांचे एकूण कर्ज वाटप केलेले आहे. त्याच बरोबर ५४ कोटी ९३ लाख रुपयांची संस्थेने बँकांमध्ये गुंतवणूक केलेली असून सोनेतारण व ठेवतारण कर्ज ७२ कोटी १३ लाख रुपयांचे वितरित केलेले आहे. 
        संस्थेचा समिश्र व्यवसाय २८१ कोटी ९८ लाख इतका झाला असून संस्थेकडे ४ कोटी १३ लाख रुपयांचा स्वनिधी आहे. सहकार खात्याच्या नियमानुसार ६३ टक्के इतका सीडी रेषो आहे. तर खेळते भांडवल १७६ कोटी १२ लाख आहे. वसुली चांगली असल्याने थकबाकीचे प्रमाण अत्यल्प आहे. सर्वांच्या विश्वासाने संस्था यशाचे डोंगर पार करीत आहे. संस्थेचा हा आलेख पुढे नेण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत. यापुढेही संस्थेचे कार्य अशाच प्रकारे जोमाने चालू राहील.
            संस्थेच्या यशामध्ये संस्थेचे संचालक मंडळ सर्व अधिकारी कर्मचारी, खातेदार, ठेवीदार, पिग्मी एजंट तसेच हितचिंतक व साई आदर्श परिवार यांचा सिंहाचा वाटा असल्याचे वेदांत कपाळे यांनी सांगितले. याप्रसंगी विष्णुपंत गीते, बाळासाहेब तांबे, किशोर थोरात, अविनाश साबरे, पारस नहार, विलास पाटील, मयूर पांगरे, चांगदेव साळवे व व्यवस्थापक सचिन खडके आदी उपस्थित होते.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप लोखंडे टाकळीभान यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments