महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शिर्डीला भेट देऊन घेतले साई दर्शन!

शिर्डी (प्रतिनिधी)महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या पोलीस महासंचालक रश्‍मी शुक्‍ला यांनी गुरुवार 10 एप्रिल 2025 रोजी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. साईदर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्‍यांचा शाल श्री साई मूर्ती देऊन सत्‍कार केला.
रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या  भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी आहेत. ज्यांनी जानेवारी 2024 पासून महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून काम केले. हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. यापूर्वी, त्यांनी भारताच्या सशस्त्र सीमा बलच्या महासंचालक म्हणून काम केलेले आहे. त्या एक शिस्तप्रिय व कार्यक्षम अशा पोलीस अधिकारी असून त्यांनी गुरुवारी शिर्डीला येऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी वरीष्ठ पोलीस अधिकारी  उपस्थित होते.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments