टाकळीभान प्रतिनिधी-: श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे भगवान महावीर जयंती मोठी उत्साहत साजरी करण्यात आली. सर्व प्राणीमात्रावर प्रेम करा, जगा आणि जगू द्या असा उपदेश करणारे भगवान महावीर यांनी ज्ञान प्राप्तीसाठी सर्व सुखाचा त्याग करून भारत भ्रमण केले.
त्यांनी बारा वर्ष तपश्चर्य केली व आपल्या इंद्रियांवर विजय मिळविल्यामुळे त्यांना जिनेन्द्रिय असे संबोधले जाते. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिगृह, ब्रह्मचर्य ही त्यांनी तत्वे मानून अहिंसा या तत्त्वाला सर्वश्रेष्ठ मानले. व यातील अहिंसा या तत्त्वाची जगाला गरज आहे. चोरी करू नये, कोणाची फसवणूक करू नये, परस्री व वडीलधाऱ्यांचा सन्मान करावा ,आचरण शुद्ध ठेवावे अशी प्रेरणादायी शिकवण त्यांनी दिली.
भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून गावातून शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील मान्यवर, पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी या शोभा यात्रेचे स्वागत केले.
व मिरवणूक नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी गावातील मान्यवर पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच जितेंद्र मिरीकर ,पवन काठेड ,सुभाष धोंडलकर राजकुमार मिरीकर ,अभिजीत मिरीकर ,डॉ. अनिलचंद गंगवालरमेश काठेड ,भारत मिरीकर,प्रकाश काठेड चेतन काठेड बंटी मिरीकर,कल्पेश मिरीकर ,मुकेश मिरीकर श्रेणिक धोंडलकर,शांतीलाल धोंडलकर,नितीन मिरीकर,बाळासाहेब चोपडा ,अनिल चोपडा ,अनिलकुमार मिरीकर ,राजकुमार माणिकराव मिरीकर ,किरण मेहेत्रे ,रवी मेहेत्रे ,अमोल धोंडलकर,राहुल धोंडलकर ,वैभव धोंडलकर ,ऋषी धोंडलकर,सतीश मिरीकर ,महावीर मिरीकर ,गणेश सिद्धेश्वर ,गौरव मिरीकर ,रोहित मिरीकर,
युवराज मिरीकर ,सोहम वायकोस ,अमित मिरीकर
रमेश धोंडलकर ,तन्मय काठेड,यश काठेड आदी सह मोठ्या संख्येने पुरुष- महिला , टाकळीभान सकल जैन समाज बांधव उपस्थित होते.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप लोखंडे टाकळीभान यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
0 Comments