, शिर्डी (राजकुमार गडकरी) विद्येविना मती गेली ,मतीविना नीती गेली ,नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविण शूद्र खचले, इतके अनर्थ एका अ विद्येने केले .हे शिक्षणाचे महत्त्व समजून सांगणाऱ्या आणि प्रत्यक्ष स्रीशिक्षणाचे प्रचंड मोठ काम उभे करणारे समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची 198 वी जयंती जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सावळीविहीर बुद्रुक तालुका राहाता या शाळेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावळीविहीर बुद्रुक गावचे माजी उपसरपंच गणेश कापसे, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर जपे ,त्याचप्रमाणे निलेश सांगळे, अनुजा सांगळे, शाळेचे मुख्याध्यापक श्री नानासाहेब मेहेत्रे उपस्थित होते. प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर शाळेतील विद्यार्थिनी कुमारी कार्तिकी आरणे ,श्रावणी जपे, वेदिका टिळे यांनी अतिशय छान अशी महात्मा फुले यांच्या जीवनावर भाषणे केली, त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षक श्री दत्ता गायकवाड यांनीही महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित माहिती सांगितली. यावेळी उपसरपंच गणेश कापसे म्हणाले की ज्योतिबा फुले यांनी जर स्त्री शिक्षणाचे कार्य हाती घेतले नसते तर आज समाजातील परिस्थिती अतिशय वेगळी दिसली असती. स्त्री शिकली नसती तर जगाची प्रगती झाली नसती .महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने सावळविहीर बुद्रुक केंद्र शाळेची माजी विद्यार्थिनी कुमारी अनुजा निलेश सांगळे हिचे जपान मधील नामांकित कंपनीमध्ये वार्षिक 18 लाख रुपये पॅकेजवर निवड झाल्याबद्दल, तिचाही सत्कार करण्यात आला. हिच्या सत्कारामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळाली. तसेच तिच्यामुळे शाळेचे गावाचे आणि शिक्षकांचे नावलौकिक झाले. अशा शब्दात सागर जपे यांनी हिचे कौतुक केले. तिच्या पालकांनी हिला अतिशय चांगल्या प्रकारचा पाठिंबा दिला म्हणूनच अनुजा हे मोठे यश संपादन करू शकले म्हणून तिच्या पालकांचाही शाळेचे मुख्याध्यापक यांनी सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना कुमारी अनुजा सांगळे म्हणाली की या शाळेत पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण घेतले ,त्यावेळी माझा शिक्षणाचा पाया अतिशय चांगला भक्कम झाला. त्याचप्रमाणे मला चांगले शिक्षण मिळाले ,हे मी माझे भाग्य समजते. म्हणून मला हे यश मिळू शकले, त्याचप्रमाणे माझ्यासारखेच किंवा माझ्यापेक्षाही मोठ्या पदावर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी जावेअशी मी इच्छा व्यक्त करते आणि शाळा ,शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ यांच्या ऋणात राहू इच्छिते. शाळेत कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री सिताराम गुरसळ ,श्रीमती रूपाली मनरे,श्रीमती विद्या गोर्डे, श्रीमती सुचित्रा चवाळे , संगीता याईस, सविता बर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दत्ता गायकवाड यांनी केले तर आभार विद्या गोर्डे यांनी मानले.
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)
0 Comments