प्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया व माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी गुरुवार 10 एप्रिल 2025 रोजी सकाळी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साईदर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी उप मुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध क्रिकेटपटू रवी शास्त्री माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आपण गेल्या 40 वर्षापासून शिर्डीला साई दर्शनासाठी येत असतो. येथे आल्यानंतर साईबाबांचे दर्शनच महत्त्वाचे आहे. क्रिकेट सेकंडरी आहे. गेल्या 40 वर्षांमध्ये येथे मोठा बदल झाला आहे. दररोज साठ हजार साई भक्त येथे येतात असे समजले. येथे नेहमी गर्दी असते. देशाप्रमाणे परदेशातही आपण क्रिकेटच्या निमित्ताने जात असतो तेथेही मोठ्या संख्येने साईभक्त आहेत. असे सांगत पूर्वीचे क्रिकेट व आताचे क्रिकेट यात खूप बदल झाल्याचे विचारताच सर्व काही बदलत असते. क्रिकेटही बदलत आहे. क्रिकेट बदलणार , क्रिकेटचा खेळ बदलणार, क्रिकेटचे खेळाडू बदलणार !मात्र साईबाबांचा दर्शन हे चिरकाल तसंच राहणार, असं सांगत साई दर्शनाने छान वाटले, येथे आल्यानंतर शांती मिळते असे समजत येथे आल्यानंतर साईबाबांकडे आपण फक्त थँक्यू म्हणतो व शांती द्यावी, एवढीच प्रार्थना करतो असे रवी शास्त्री यांनी यावेळी सांगितले.तर प्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी यावेळी सांगितले की येथे आल्यानंतर साई दर्शनामुळे मोठा आनंद मिळतो. यापूर्वी कोरोना अगोदर आपण येथे आलो होतो .त्यानंतर आता साई दर्शनासाठी आलो आहे. असे ते म्हणाले.
साईबाबांच्या दर्शनामुळे मिळते शांती-रवी शास्त्री
साई दर्शनामुळे खूप आनंद वाटला उद्योगपती-- गौतम सिंघानिया.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
0 Comments