दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.09- - माता सीता जेव्हा अशोक वनात बंदिस्त होत्या तेव्हा आपली ख्याली खुशाली एका वृक्षाच्या पानावर काडीने लिहून पाठवत असत.त्यावर लिहिलेलं अक्षर ही सहसा मिटत नाही व या झाडाची पाने त्या आपले दूत हनुमाना मार्फ़त श्रीरामांना पोहचवत असत.त्याच वृक्षाला रामायण काळा पासून "सीतापत्र" असे नाव पडले.या वृक्षाशी प्रभू राम ,सीता व हनुमान या तीघांचा संबंध आलेला आहे.
हा वृक्ष अत्यंत दुर्मिळ व पवित्र असून तो संकटग्रस्त म्हणून आय. यु. सी.एन. च्या रेड लिस्ट यादीत समाविष्ट करण्यात येऊन त्यास कायद्याने संरक्षण प्राप्त आहे.नुकतेच अयोध्येत रामायणात उल्लेखलेले सर्व वृक्ष या निमित्ताने पंत प्रधान नरेंद्र मोदी लावण्यात आले आहेत त्यात सीतापत्र ही आहे.या ऐतिहासिक वृक्षाचे महत्व लक्षात घेता पर्यावरण संवर्धक, अभिनव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. संतोष पाटील यांनी ही रोपे विकसित केली आहेत व त्यांनी ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पर्यावरण गतीविधी उपक्रमा द्वारे आज श्रीराम नवमीचे औचित्य साधत तळणी येथील रुद्रेश्वर महादेव मंदिराच्या आवरातील हरितवनात बालयोगी स्वामी विद्यानंद महाराज, दगडू पाटील ठोंबरे,यांच्या हस्ते रोपण करण्यात आले.
--औषधी गुणांचे महत्व-कॉर्डीया मॅक्लियासी असे शास्त्रीय नाव असून तो भोकर कुळातील वृक्ष आहे व याची साल जर दुधात टाकली तर दही बनते म्हणून यास दही पलाश ही म्हणतात.याच्या पानांचा व मुळांचा कॅन्सर मध्ये प्राचीन काळापासून उपयोग आयुर्वेदात वर्णिलेला असून ,सर्पविष व विंचू विषावर पारंपरिक औषध म्हणून ते प्रचलित आहे- डॉ. संतोष पाटील,सोयगाव- सिल्लोड --फुलपाखरे व मधमाशा यांना या झाडाची मंद सुगंधी फुले आकर्षित करत असल्याने जैविविधता हेतू ही उपयोगी आहे.
-- हा वृक्ष धोक्यात का आला. --सदर वृक्ष नैसर्गिक रित्या अमर कंटक,सरगुजा,कबीरधाम,पंचमढि, छत्तीसगड मधील जंगल ,सातपुडा आदी ठिकाणी तुरळक रित्या आढळतो.इंग्रज काळात क्रांतिकारक गोपनीय पत्र व्यवहारासाठी या पानांचा उपयोग करत असत म्हणून इंग्रजांनी ही झाडे मोठया प्रमाणात तोडली त्यामुळे ही जैवविविधता संकटात आली.या वृक्षाचे बीज लवकर किडते,जर्मिनेशन क्षमता कमी असते.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
0 Comments