मुंबई इंडियन्सचा खेळाडू सूर्यकुमार यादव व रिलायन्स समूहाचे उद्योगपती आकाश अंबानी यांनी शनिवारी शिर्डीत येऊन घेतले साईबाबांचे दर्शन!

शिर्डी (प्रतिनिधी) रिलायन्‍स जियो इन्फोकॉम लिमिटेडचे अध्‍यक्ष प्रसिध्‍द उद्योगपती आकाश अंबानी व भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सुर्यकुमार यादव यांनी शनिवारी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. साईदर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने  मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर  यांनी त्‍यांचा शालप्रसाद देऊन सत्‍कार केला. यावेळी मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते.
(मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी साई चरणी केली मनोमन प्रार्थना!!)

सध्या आयपीएल 2025 क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत.या स्पर्धेतील मुंबई इंडियन्स संघाचे  मालक नीता अंबानी,आकाश अंबानी असून या संघातील महत्त्वाचा क्रिकेट खेळाडू सूर्यकुमार यादव आहे. आयपीएल 2025 क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्यानंतर नीता अंबानी आकाश अंबानी यांनी शिर्डीला येऊन साईबाबांचे दर्शन घेतले व मुंबई इंडियन्स क्रिकेट संघाला विजय मिळू दे म्हणून मनोमन साई चरणी साकडे घातले आहे. त्यामुळेच या स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाने पुन्हा एकदा मोठी कमाल केली आहे. हा संघ सुरुवातीला गुणतालिकेत नवव्या स्थानी होती. त्यात चार सामने गमवल्याने कमबॅक कठीण आहे असंच वाटत होतं. पण त्यानंतर सलग चार सामन्यात विजय मिळवून मुंबई इंडियन्सने तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्स नऊ सामने खेळली असून त्यात पाच सामन्यात विजय आणि चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. सलग चार सामने जिंकल्याने इतर संघांचे देखील धाबे दणाणले आहेत. आता मुंबई इंडियन्स पाचव्या विजयासाठी सज्ज झाली आहे. मुंबईचा दहावा सामना 27 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. यासाठी मुंबईने खास रणनिती आखली आहे. हा सामना दुपारी 3.30 वाजता सुरु होणार आहे. तत्पूर्वी शनिवारी 26 एप्रिल 2025 रोजी मुंबई इंडियन्सचे  आकाश अंबानी व प्रमुख क्रिकेट खेळाडू सूर्यकुमार यादव यांनी शिर्डीला भेट देऊन समाधीचे दर्शन घेतले .मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळू दे ,म्हणून मनोमन प्रार्थना केली. यापूर्वीही नीता अंबानी शिर्डीला आल्या होत्या त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले व त्यानंतर मुंबई इंडियन्स क्रिकेट संघ विजयी झाला होता. त्यानंतर आकाश अंबानी आले त्यांनी साई दर्शन घेतले व त्यानंतरही मुंबई इंडियन्स संघाला विजय प्राप्त झाला होता. आता 27 एप्रिल 2025 रोजी मुंबई येथे क्रिकेट मॅच असून तत्पूर्वी आकाश अंबानी व सूर्यकुमार यादव शिर्डीत येऊन त्यांनी साई चरणी नतमस्तक होत मुंबई इंडियन्सला विजय मिळावा म्हणून मनोमन प्रार्थना केली आहे. आकाश अंबानी व सूर्यकुमार यादव शिर्डीत आल्याचे पाहून क्रिकेटच्या चाहत्यांनी, साईभक्तांनी त्यांना मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments