राहाता प्रतिनिधी) तु तुझ्या नवऱ्याला घटस्फोट दे!आपण लग्न करु मी तुला सुखात ठेवेन तुझ्या मुलाची चिंता करू नको असे लग्नाचे आमिष दाखवून ठाणे येथील एका विवाहितेची राहाता तालुक्यातील नांदुर्खी येथील एका इसमाने फसवणूक करत शिर्डी नाशिक पुणे अहमदनगर कराड अशा विविध ठिकाणी नेऊन तिच्या सोबत शारीरिक संबंध केले विवाहितेने लग्नाचा लकडा लावताच त्याने पोबारा केला.
सविस्तर वृत्त असे की राहता तालुक्यातील नांदुर्खी येथील मुकूंद भानुदास बिडवे (४२) याने विवाह संस्थेच्या संकेतस्थळावरुन ठाण्यातील एका विवाहितेस लग्नासाठी रिक्वेस्ट पाठवली त्या महिलेस १० वर्षाचा एक मुलगा असुन मुकुंद बिडवे म्हणाला की तु तुझ्या नवऱ्याला घटस्फोट दे.पण घटस्फोटाची प्रक्रिया लांबती असल्याने लवकर घटस्फोट होत नाही याचा गैरफायदा घेऊन फसविले पहिल्या पतीपासून घटस्फोट सहजासहजी शक्य नसल्याचे आरोपीने तिला गोड गोड बोलून पूर्णपणे जाळ्यात अडकविले नेहमी पैशाची मागणी आणि मानसिक छळ करत त्यातच गोड बोलुन नाशिक,पुणे कराड शिर्डी,अहिल्यानगर अशा अनेक ठिकाणी नेऊन तिला शारिरीक संबंध करण्यास भाग पाडले.विवाहितेने लग्नाचा जास्त आग्रह केल्याने मुकुंद बिडवे फरार झाला त्यात त्याला त्यांचे कुटुंबीय मदत करत असल्याचा आरोप विवाहितेने केला आहे.
आणि आता त्याच्या घरचे लोक यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहे.मात्र विवाहितेने थेट ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली पोलिसांना सविस्तर वृत्त सांगताच त्यांनी आरोपी मुकुंद भानुदास बिडवे (वय) यांचेवर भारतीय न्याय संहिता २०२३ ६९ भारतीय न्याय संहिता २०२३ ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रोहिणी नरशिंगे हे करित आहे
0 Comments