आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शालेय वकृत्व स्पर्धेत कु.क्रांती गावडे प्रथम --


 

दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.15 - सोयगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कुमारी क्रांती निलेश गावडे हिचा कै. शिवराम बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित साईराज इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय जेऊर तालुका कन्नड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शालेय वकृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला. 
संस्थेचे अध्यक्ष श्री संदीप पवार  यांच्या हस्ते तिला रोख 11111/- रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेच्या तयारीसाठी तिला तिच्या वर्गशिक्षीका श्रीमती पी. एम. भिसे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक  पोत्रे व सर्व शिक्षक वृंदांनी तिचे अभिनंदन केले.

ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे 

Post a Comment

0 Comments