दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.15- सोयगाव येथील पंचायत समितीच्या बचत भुवन सभागृहात मंगळवारी दुपारी एक वाजता तालुक्यातील 46 ग्रामपंचायत सरपंचपदाची आरक्षण सोडत एका लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढून जाहीर करण्यात आली आहे.
त्यात सर्व प्रवर्गातील 23 महिलांना सरपंचपदाची संधी मिळाली असून त्या गावांचा कारभार चालविणार आहेत. 2025-30 या दरम्यान गठित होणाऱ्या ग्रामपंचायतीकरिता ही आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यामुळे आता सोयगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकिय वातावरण तापणार आहे.यावेळी नोडल अधिकारी म्हणून तहसीलदार मनीषा मेने- जोगदंड यांनी काम पाहिले. तर त्यांना गटविकास अधिकारी दादाराव अहिरे यांनी मदत केली. यावेळी नायब तहसीलदार संभाजी देशमुख, सहायक गटविकास अधिकारी तात्याराव माळी, गटशिक्षणाधिकारी रंगनाथ आढाव,विस्तार अधिकारी अशोक दौड,सुनील राकडे,दिपक फुसे,उज्ज्वला वामने यांची उपस्थिती होती.तालुक्यातील 24 जागा सर्वसाधारण प्रवर्गातील सरपंचपदासाठी सुटल्या आहेत. यामध्ये ही १२ महिलांना संधी मिळाली आहे यामुळे सोयगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापणार आहे. 2025 ते 2030 या कालावधीसाठी मुदत संपणाऱ्या 46 ग्रामपंचायत साठी ही सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.दरम्यान आरक्षित ग्रा.पं. सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीची चिठ्ठी मुलाच्या हस्ते काढण्यात आली.
--ग्रामपंचायतनिहाय आरक्षण
---सर्वसाधारण (12) फरदापुर, वरखेडी(बु),माळेगाव, सावळदबारा, जरंडी, देव्हारी, पहुरी (बु),वाडी सुतांडा,वरखेडी( खु),बहुलखेडा, नांदगाव,मोहळाई,
---सर्वसाधारण महिला (12) आमखेडा, पळसखेडा, किन्ही,वनगाव,वरठाण,बनोटी, डाभा,निंबायती,जंगलीकोठे, गलवाडा(सो,),कंकराळा,दस्तापुर,
---नागरिकांचा मागास प्रवर्ग (6) निंभोरा,वडगाव(ति),गोंदेगाव,रवला, पळाशी, सावरखेडा,
---नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (6)नांदा तांडा,तितुर, टिटवी,कवली,पिंपळ वाडी,तिडका,
---अनुसूचित जाती (2) मोलखेडा, जंगलातांडा या दोन ग्रामपंचायती अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सुटल्या असून अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी निमखेडी आणि शिंदोल या ग्रामपंचायती राखीव झाल्या आहे .अनुसूचित जमाती साठी घोसला, वाकडी आणि जामठी या तीन ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव झाल्या तर हनुमंतखेडा,उप्पलखेडा,घानेगाव तांडा या तीन ग्रामपंचायती अनुसूचित जमाती सर्वसाधारण प्रवर्ग पुरुषांसाठी सुटल्या आहे.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
0 Comments