दिलीप लोखंडे
टाकळीभान, ( प्रतिनिधी) श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथे संविधान ग्रुप, रिपाई आठवले गट, वंचित बहुजन आघाडी व विविध सामाजिक संघटना तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी, ग्रामस्थांच्या वतीने बसस्थानक परिसरात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माजी सभापती नानासाहेब पवार व माजी सभापती दिपक आण्णा पटारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विधीवत पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तिन्ही महापुरुषांना विनम्र अभिवादन करण्यात आले. आयोजकांच्या वतीने या जयंतीनिमित्त सर्व महापुरुषांना मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आल्याने याद्वारे एकात्मतेचा व समतेचा संदेश दिला गेल्याने ग्रामस्थांच्या वतीने या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे टाकळीभान ग्रामपंचायत कार्यालय, बाजार समिती कार्यालय, विविध विद्यालय येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त संविधान ग्रुपच्या वतीने शालेय गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात येऊन येथील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
तसेच बस स्टँड परिसरामध्ये आय लव यू डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाचे डिजिटल लाईट फलकाचे अनावरण रिपाईचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या हस्ते सायंकाळी सात वाजता करण्यात आले. तदनंतर
सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान नामांकित बँड पथक व भव्य रथामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ठेवून,शोभेच्या दारूची आतिषबाजी सह भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या जयंती कार्यक्रम प्रसंगी प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस अधिक्षक राॅबीन बन्सल, पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, पोलीस गुप्त विभागाचे अनिल शेंगाळे, मेजर विनोद रणनवरे, चित्रसेन रणनवरे, रिपाईचे आबासाहेब रणनवरे, महिला आघाडीच्या नेत्या अनिता तडके, उपसरपंच कान्हा खंडागळे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, मार्केट कमिटीचे संचालक मयुर पटारे, टाकळीभान विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन राहूल पटारे, संत सावता सोसायटीचे संचालक विलास दाभाडे, टाकळीभान सोसायटीचे विद्यमान चेअरमन एकनाथ पटारे, प्रा. कार्लस साठे ,प्रा.जयकर मगर, श्रीधर गाडे, भैय्या पठाण ,संजय रणनवरे, विजय आहेर, सुंदर रणनवरे, आप्पासाहेब रणनवरे, सतीश रणनवरे, मल्हार रणनवरे, संदिप शिनगारे, जाॅन रणनवरे, संदिप रणनवरे, मोहन रणनवरे, बबलू वाघुले, शरद रणनवरे, पप्पू रणनवरे, नवाज शेख, भाजपाचे नारायण काळे, मोहन रणनवरे, अण्णासाहेब दाभाडे, अक्षय कोकणे, संतोष पटारे सुजित बोडखे, सुनील रणनवरे ,राजेंद्र रणनवरे ,आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments