शताब्दी वर्ष... शत अजाणवृक्ष, हरितवारी तून अध्यात्मिक महत्त्व व वारकरी संप्रदायात पूजनीय असलेल्या अजानवृक्ष व सीतापत्र चे काशी विश्वेश्वर मंदिर परिसरात रोपण --

दिलीप शिंदे सोयगाव 


सोयगाव दि.12- -सध्या राष्ट्रीय स्वयं सेवक संघांचे स्थापना शताब्दी वर्ष सुरु आहे. त्या अनुषंगाने सिल्लोड जिल्हा राष्ट्रीय स्वयं सेवक संघ शाखेच्या वतीने शताब्दी वर्ष, शत अजाणवृक्ष" हा हिंदू धर्म संस्कृती व पर्यावरण यात मोलाचे महत्व असलेल्या अजाणवृक्षाचे आज धानोरा येथील  काशी विश्वेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात डॉ.संतोष पाटील यांनी हरीतवारी उपक्रमाद्वारे महंत सर्वांनंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते रोपण करण्यात आले.

असे शंभर वृक्ष जिल्ह्यात लावून संगोपीत केले जात आहेत.सोबतच रामायनात महत्व व वर्णन असलेल्या "सीतापत्र" हा दुर्मिळ व  आय यु सी एन च्या रेड लीस्ट मधील संरक्षित वृक्ष ही रोपण करण्यात आला. देवस्थानाने संगोपणाची जबाबदारी स्वीकारली आहे. 12 व्या शतकात अखंड महाराष्ट्राची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.समाधी घेतेवेळी त्यांनी त्यांच्या हातात असणारा अजाणवृक्षा चा दंड समाधी समोर जमिनीत रोवला व त्यालाच कालांतराने पालवी फुटून विशाल अशा अजानवृक्षात रूपांतर झाले व गेली सातशे वर्ष तो सिद्ध ज्ञानवृक्ष उभा असून ते समुद्र मंथनातुन निघालेले रत्न आहे.
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)

Post a Comment

0 Comments