टाकळीभान प्रतिनिधी - स्त्रियांच्या शिक्षणासाठी आपले आयुष्य वेचणारे, पीडित-शोषितांच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे, तसेच महिलांच्या सशक्ती करण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष हा आदर्शाच्या रूपाने कायम समाजाला प्रेरणा देत राहील असे गौरव उदगार मार्केट कमिटीचे उप बाजार समितीचे संचालक मयूर पटारे यांनी केले.
थोर समाजसुधारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त टाकळीभान येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते
याप्रसंगी संत सावता सोसायटीचे संचालक विलास दाभाडे, नितीन दहे, आनंद कांबळे, ललित कोठारी, तात्या बनकर, भैया पापडीवाल, सर्व कांदा व्यापारी व समस्त माळी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप लोखंडे टाकळीभान यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
0 Comments