राजकुमार गडकरी शिर्डी
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सावळीविहीर बुद्रुक येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सोमवार दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी सकाळी आठ वाजता येथील लुंबूनी बुद्ध विहार येथून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करत भव्य रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर येथील स्मारक च्या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदना घेण्यात येणार आहे . त्यानंतर सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची गावातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब यांच्या जयंती निमित्ताने भव्य अशा सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यानंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न होणार असून या पारितोषिक वितरण समारंभाला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पंणतु मान. श्री. अक्षय दिलीपराव आंबेडकर हे स्वतः उपस्थित राहणार आहेत.हा कार्यक्रम लिंबोणी बुध्दविहार, कारवाडी रोड, सावळीविहीर बु.येथे होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे एकता तरुण मंडळ व लिंबूनि बुद्ध विहार कमिटीचे सचिन (पप्पू )वाघमारे ,आकाश वाघमारे, राहुल वाघमारे ,पंकज वाघमारे मंगेश वाघमारे ,मनोज वाघमारे ,रवींद्र वाघमारे, सचिन वाघमारे ,सुरेश वाघमारे, शशिकांत कोळगे, शुभम गोडगे, आदिसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेमी यांनी आवाहन केले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व लिंबूनि बुद्ध विहार येथे आकर्षक विद्युत रोषणाई व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जयंती निमित्ताने गावात ठिकठिकाणी फलक लावण्यात येणार आहेत.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
0 Comments