श्रीक्षेत्र पिंपळदरी ( प्रतिनिधी)
येडूआई तूझ्या दर्शनासाठी येवढ्या लखलखत्या ऊन्हात गडावर आलेल्या माझ्या भिल्ल समाज्याची ईडापिडा टळु दे आणि माझ्या भिल्ल समाजाला सुखी ठेव येवढेच मागणे घेऊन तुझ्याकडे आलो आहे असी भावनिक मागणी एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी येडूआई चरणी नतमस्तक होऊन केली.
श्रीक्षेत्र पिंपळदरी येथील येडूमातेच्या यात्रेस प्रारंभ झाला आहे व राज्यातील लाखो भिल्ल समाज नवसपुर्ती करण्यासाठी व दर्शनासाठी येडूआई गडावर पोहचला आहे. तसेच राज्यातील प्रमुख आदिवासी नेते देखिल गडावर उपस्थित आहेत.भिल्ल समाजाचे संपुर्ण राज्यात सर्वात प्रखर व निर्भिड नेते म्हणून ओळखले जाणारे एकलव् भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी सहकुटुंब गडावर येऊन देवीची पूजा केली व दर्शन घेतले. त्या वेळी ते बोलत होते.
श्री.अहिरे पुढे म्हणाले की, येवढ्या लखलखत्या ऊन्हात माझा भिल्ल समाज येडूमातेच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित आहे.तर काही अनवानी पायाने पाई चालत आलेले आहेत.ही केवळ येडूआई देवीवर असलेली भिल्ल समाज्याची अपार श्रद्धा आहे. मोलमजुरी करून ,उसनवारी करून, मिळालेल्या तुटपुंज्या पैशात नवस पुर्ती करण्या साठी माझा भिल्ल समाज गडावर दाखल झाला आहे,माझे येडूआई कडे एकच मागणे आहे कि,माता माझ्या समाज्याला सुखी ठेव समाज्याची ईडा पिडा टळुदे आणि माझ्या समाज्याला सुखी समाधानाचे दिवस येऊ दे. माझा भिल्ल समाज शेकडो वर्षांपासून तूझी मनोभावे पुजा करीत आला आहे माझ्या समाजाच्या झोळीत भरभरून आनंद घाल अशी साद यावेळी ज्ञानेश्वर अहिरे यांनी घातली.आज लाखो भिल्ल समाजाने देवीचे दर्शन घेतले.वेळी आदिवासी भिल्ल समाज्याचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.
0 Comments