मिरवणुकीत सकल जैन बांधव व भगिनी मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या . सर्वांनी मिरवणुकीत सहभाग घेत नृत्य, फुगड्या तसेच जैन गीते व घोषणा देत भगवान महावीरांची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढली. श्री महावीर जयंती निमित्त श्री ज्ञानतीर्थ दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमल मंदिर सावळी विहीर फाटा व सावळीविहीर वर्धमान श्रावक संघ यांच्या वतीने सामूहिक पूजा पठण यावेळी ज्ञानतीर्थ मंदिरात करण्यात आले. या ज्ञानतीर्थ मंदिरामध्ये भव्य अशी पंधरा फूट सुंदर पद्मासनातील पारसनाथ भगवान यांची मूर्ती आहे. येथे अष्ट धातूच्या पद्मासनातील भगवान महावीर यांच्या मूर्तीवर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पंचामृत अभिषेक शांतीधारा करून आरती करण्यात आली. यावेळी येथील पिठादेश स्वस्ति श्री रवींद्र कीर्ती जी स्वामी, किशोर गंगवाल, प्रेमाबाई बज, आदी मान्यवर होते.श्री ज्ञानतीर्थ दिगंबर जैन तीर्थस्थान कमल मंदिराचे प्रबंधक उपेंद्र मिश्रा यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले .त्याचप्रमाणे येथील जैन स्थानक येथेही भगवान महावीर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमाला संघपती माणिकचंद कोठारी , अध्यक्ष दिलीप शेठ बाठीया नवकार युवक मंडळाचे अध्यक्ष योगेश लोढा, उपाध्यक्ष प्रशांत कोठारी, सर्व सदस्य, आदींसह कोठारी ,लोढा ,बाठीया, गंगवाल, पिपाडा, डुंगरवाल, आदींसह जैन समाजातील कुटुंबातील सदस्य तसेच सावळीविहीर व परिसरातील सर्व जैन बांधव यावेळी उपस्थित होते. श्री महावीर जयंती निमित्त दुपारपर्यंत जैन बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
0 Comments