सावळीविहीर बुद्रुक येथे हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरा! दिवसभर मंदिरात दर्शनासाठी गर्दी!

शिर्डी ( प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. शनिवार 12 एप्रिल 2025 रोजी श्री हनुमान जन्मोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. त्याचप्रमाणे राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथेही श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त शनिवारी पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.

 श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्री ना स्नान, त्यानंतर भजन हरिपाठ आदी कार्यक्रम झाले. ठीक सूर्योदयाच्या वेळी फुलांनी सजवलेल्या पाळण्यामध्ये हनुमानाची प्रतिमा ठेवून पाळणा हलवत आरती करण्यात आली, महिला भजनी मंडळाकडून पाळणा म्हणण्यात आला. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान!! हे हनुमंता दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया, बालपणी गेलास तू सूर्याला धराया! हादरली ही धरणी ,तरतरले आसमान ,एक मुखाने बोला जय जय हनुमान!! म्हणत श्री हनुमान जी चा जय जय कार करत  ,श्री रामाचा जयजयकार करत श्री हनुमान जी चा जन्मोत्सव साजरा करण्यात आला .त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला ह भ प मनोज भाऊ बिडवे, सुभाष पोपळघट, विक्रम आगलावे, रविंद्र कापसे, सरपंच ओमेश जपे, पत्रकार राजकुमार गडकरी, विलास रेवगडे, साईश गडकरी, प्रितम कापसे, गणेश पळसे, सतीश जपे,निघुते , पैठणे साहेब ,भारत दोडिया, मनोज जपे,लखन कासवे, नाना जाधव,तसेच पद्माताई कापसे, बेबीताई सोनवणे, सौ सुनीता गोकुळ जपे,सौ. सुनिता सतीश जपे, परसराम जपे, नानी दहिवाळ, फासगे ताई, रेवगडे ताई,मंदाताई आगलावे, गायकवाड ताई, जपे ताई,आदींसह महिला भजनी मंडळ व श्री हनुमान भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे दिवसभर श्री हनुमान मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती.        तसेच दर शनिवारी सायंकाळी होणाऱ्या सामूहिक श्री हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाप्रमाणेच आजही  शनिवारी श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात श्री सामूहिक हनुमान चालीसा पठण व सामूहिक श्री हनुमान जीची महाआरती हनुमान मंदिरात होणार आहे.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments