श्री.क्षेत्र पिंपळदरी येथील येडूआईचा गड आदिवासी भिल्ल समाजाच्या आगमनाने खुलला असुन भिल्ल समाजाने येडूआई यात्रेचा मनमुराद आनंद घ्यावा असे आवाहन एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे आणि विद्रोही आदिवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव बर्डे यांनी तमाम भिल्ल समाजाला केले आहे.
यांनी म्हटले आहे की, संपुर्ण महाराष्ट्रातील आदिवासी भिल्ल समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पिंपळदरी येथील येडूमातेच्या यात्रेस सुरूवात झाली असुन राज्यभरातून लाखो भिल्ल समाज गडावर यायला सुरूवात झाली आहे त्या मुळे गड खुलून गेला आहे.यात्रेत शासनाकडून नियोजनबद्ध पद्धतीने बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.तसेच यात्रेत येडूआई अन्नछत्र संस्थेकडून अन्नदान करन्यास सुरूवात झाली आहे.
यात्रेच्या मुख्य दिवशी १३ एप्रिल रोजी रोजी पहाटे देवीचे अभ्यंगस्नान होईल,चार वाजता अभिषेक पुजा करन्यात येईल,पाच वाजता देवीला साडी चोळी बांगडी साज परीधान करण्यात येईल,सकाळी आठ वाजता गावातून मांडव डहाळी वाजत गाजत आणली जाईल,दहा वाजता लेझीम कार्यक्रम होईल,त्या नंतर सकाळी ११ वाजता नवसपुर्ती करण्यात येईल.दुपारी ४ वाजता मानाची काठी निघेल व गडावर देवीचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम होईल.
रात्री ९ वाजता छबीना नीघेल.रात्री लोकनाट्य तमाशा होईल,तर दुसर्या दिवशी १४ एप्रिल रोजी कुस्त्यांचा हंगामा होईल असे अतीशय भरगच्च कार्यक्रम आहेत. या वेळी
एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे विद्रोही आदिवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव बर्डे,येडूआई अन्नदान संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गांगुर्डे, आदिवासी एकता परीषदेचे संस्थापक कैलास दादा माळी, भास्करराव बर्डे, रंगनाथ आहेर,भाऊ अहिरे, चंद्रकांत धिरवडे, राधाकृष्ण बर्डे, युवराज बर्डे,भारत जाधव, आप्पासाहेब बर्डे, शिवाजी जाधव, संपत मोरे, मच्छिंद्र बर्डे, संजय बर्डे , अनिल जाधव, सुनिल बर्डे, रघुनाथ अहिरे, आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी सामाजिक व एकलव्य भिल्ल सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे .)
0 Comments