सोयगाव येथील जागृत भैरवनाथांची चैत्रपौर्णिमेला यात्रा, भैरवनाथ संस्थानाची जय्यत तयारी---



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव,दि.11-  सोयगाव शहराचे ग्रामदैवत ,नवसाला पावणारा भैरवनाथ महाराज चैत्रपौर्णिमा दि.12 शनिवारी  होत असलेल्या यात्रोत्सवाची अंतिम तयारी संस्थानच्या वतीने पूर्ण करण्यात आली आहे. मराठवाडा, खान्देश व विदर्भासह राज्यातुन दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेले जागृत भैरवनाथ महाराजांची स्वयंभू व संपूर्ण लोण्याची मूर्ती आहे. 

    शहरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या भैरवनाथांचे मंदिर हे जागृत देवस्थान आहे.भैरवनाथांची स्वयंभू मूर्ती असून संपूर्ण लोण्याची आहे. चैत्रपौर्णिमेला याठिकाणी मोठी यात्रा भरत असते. भाविकांनी कबूल केलेला नवस चैत्रपौर्णिमेला फेडला जातो. यात्रेदरम्यान कबूल करण्यात आलेला नवस बारा गाड्या ओढून व डाळ बट्टीचा नेवैद्य दाखवून पूर्ण केला जातो. नवस कबूल केलेल्या भाविकांची व दर्शन साठी येणाऱ्या भक्तांची मोठी गर्दी असते.  नवस फेडणाऱ्या भाविकांसह भक्तांसाठी पाणी टंचाई निर्माण होऊ नये याकरिता  संस्थांनच्या वतीने पिण्याच्या पाण्याची टँकर द्वारे व्यवस्था करण्यात येते.  संस्थानचे अध्यक्ष दिलीप बिर्ला,रवींद्र काळे,राजू अहिरे,राजेंद्र जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा कमिटीचे सदस्य व स्वयंसेवकानी यात्रेची जय्यत तयारी केली आहे. भाविकांनी शांततेत दर्शन घ्यावे यात्रेला गालबोट लागणार नाही असे कृत्य करू नये असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

        भाविकांनी आपल्या पाल्याचा कबूल केलेला नवस फेडण्यासाठी चैत्रपौर्णिमेच्या आदल्या दिवशी त्यास सायंकाळी हळद लावून  वाजतगाजत मानाची असलेली पाटलाची बैलगाडीची पूजा करून नारळ फोडावे लागते त्यानंतर मारुतीचे दर्शन घेऊन या ठिकाणी नारळ फोडून लोहाराचा गळ याची पूजा करून तिथे पण नारळ फोडून घरी आणले जाते. त्यानंतर दुसऱ्यादिवशी चैत्रपौर्णिमेला बारागाड्या ओढून भैरवनाथांचा कबूल केलेला नवस फेडला जातो.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments