दर्शन पास वितरण काउंटरवर विसरलेली सुमारे आठ हजार रुपये रक्कम असणारी पर्स !त्या महिला साईभक्ताला मिळाली परत!जनसंपर्क विभागाच्या कर्मचारी श्रीमती रेणुका श्रीनिवास, नाईक यांचे या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र होत आहे कौतुक!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी मध्ये अनेकदा साई भक्तांचे पर्स, दागिने हरवतात,गहाळ होतात. मात्र ते संस्थान कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना सापडल्यानंतर अनेकदा ते प्रामाणिकपणे संरक्षण कार्यालयात जमा करतात. त्या साई भक्तांची ओळख पटवून त्यांना ते परत केले जाते.

 असा हा प्रामाणिक पणाचा सिल्सिला साई संस्थान मध्ये सुरू असल्यामुळे या प्रामाणिकपणाचे कौतुक साईभक्त व शिर्डी आणि परिसरातही होत आहे. अशीच एक घटना नुकतीच बुधवार दिनांक दिनांक 23/04/2025 रोजी गेट क्रमांक 6 येथील सशुल्क दर्शन पास वितरण काउंटर येथे घडली. येथे जनसंपर्क विभागाच्या कर्मचारी श्रीमती  रेणुका श्रीनिवास नाईक यांची ड्युटी होती. त्याठिकाणी पास घेणेकरिता आलेल्या एक महिला साईभक्त हे  त्यांची  छोटी पर्स गडबडीत तेथेच विसरून गेल्या व  दर्शनपास घेऊन ते साईभक्त साईंबाबांचे दर्शनाला निघून गेले. 

सदर पर्स मध्ये 8160/- रु रोख रक्कम होती. जनसंपर्क विभागाच्या  कर्मचारी श्रीमती नाईक यांनी तात्काळ ती पर्स व पैसे संरक्षण कार्यालयात जमा केले. थोडया वेळानंतर त्या साईभक्त जी. कल्पना रा. हैद्राबाद ( आ.प्र.) यांनी संरक्षण कार्यालयात येऊन सशुल्क पास वितरण काउंटर येथे पाकीट विसरलेचे सांगितले. त्यांची ओळख पटवून त्यांना पैसे आणि पाकीट परत केले गेले. साई भक्तांना मोठा आनंद झाला. या साईभक्तांनी साईबाबा संस्थान कर्मचारी श्रीमती रेणुका नाईक यांचे आभार व्यक्त केले. या प्रामाणिक जनसंपर्क विभागाच्या कर्मचारी श्रीमती रेणुका श्रीनिवास नाईक यांचे त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments