टाकळीभानचे सरपंच पद हे आदिवासी महिलांसाठी राखीव गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांचा झाला हिरमोड


दिलीप लोखंडे 
टाकळीभान  प्रतिनिधी -टाकळीभान ग्रामपंचायतीची येत्या जानेवारी २०२६ मध्ये ग्रामपंचायत सदस्य पदाची निवडणुक होऊ घातल्याने काल बुधवारी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून लोकसंख्येच्या टक्केवारी नुसार आदिवासी प्रवर्गासाठी सरपंचपद राखीव झाले आहे. या आरक्षणाची स्त्री पुरुष सोडत आज गुरुवारी सोडत करण्यात आली  त्यामध्ये सरपंच पद आदिवासी  महिलांसाठी राखीव झाले  या आरक्षणामुळे मात्र अनेक इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
        श्रीरामपूर तालुक्यातील आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकिसाठी सरपंच पदाचे आरक्षण लोकसंख्येच्या निकषानुसार चक्राकार पध्दतीने जाहीर करण्यात आले. सरपंच पदाची निवड ही जनतेतून होणार असल्याने या आरक्षणाकडे राजकारण्यांचे लक्ष लागले होते. तालुक्यातील लोकसंख्येने मोठ्या असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी आदिवासी प्रवर्गाला संधी मिळाली आहे. यासाठी स्त्री किंवा पुरुष याबाबत आज गुरुवारी सोडत झाली त्यामध्ये. सरपंच पद हे जनतेतून असल्याने व इतर मागास प्रवर्गाला संधी मिळण्याची अपेक्षा असल्याने या प्रवर्गातील अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. काहींनी छुप्या गाठीभेटी घेवून मतदारांशी जवळीक करण्याचा प्रयत्नही सुरु केला होता. तर काहींनी दाखल्यासाठी धावपळ सुरु केली होती. तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असल्याने येथील सरपंचाचा थेट तालुक्याच्या राजकारणाशी संबंध येतो. त्यामुळे येथील सरपंच पदाची मोठी प्रतिष्ठा आहे. मात्र, लोकसंख्येच्या टक्केवारी नुसार चक्राकार पध्दतीने जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड झालेला दिसून येतो.
टाकळीभान ग्रामपंचायतीला प्रथमच लोकनियुक्त सरपंच मिळणार असल्याने आगामी काळात कोण कोणता पहिलवान फडात उभे राहतात हे पहावे लागेल.

Post a Comment

0 Comments