राजुरी (वार्ताहर ) विजय बोडखे 

राजुरी येथील आराध्य दैवत श्री बिरोबा महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .    

                    राहाता तालुक्यातील राजुरी येथील सालाबाद प्रमाणे बिरोबा महाराजांची यात्रा मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडली सकाळी पुणतांबा येथून आणलेल्या जलपाण्याने बिरोबा महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालून विधिवत पूजा करण्यात आली यानंतर काठीचे पूजन राजुरी गावचे भूषण उपसरपंच नवनिर्वाचित प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा डॉ सोमनाथ बाळासाहेब गोरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
  या वेळी दामू अण्णा गोरे, जालिंदर गोरे शिवाजी सयराम गोरे, गजानन गोरे, सोमनाथ भाऊसाहेब गोरे, शिवनाथ गोरे, कान्हा आदक सनी गोरे, पप्पू गोरडे, युवक कार्यकर्ते रमेश गोरे, सखा तात्या गोरे, अण्णासाहेब बेंद्रे , अण्णा लाळगे,यांच्यासह महिला व गावातील मान्यवर मंडळी तसेच पुणतांबा येथे पाणी आणण्यासाठी गेलेले युवक यावेळी उपस्थित होते .संध्याकाळी मिरवणुकी नंतर राजुरी   बाभळेश्वर, चांडेवाडी येथील भाविक व युवकांनी डफ वाद्य,गोल रिंगण,बिरोबा महाराजांचा जयघोष,आधी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या नंतर सोन्या गोरे व रघुनाथ गोरे पाटील व यात्रा कमिटी यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बिरोबा महाराज मंदिर व परिसरात भव्य अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच संध्याकाळी फटाक्याची आत्ताच बाजी करण्यात आली.                           फोटो                          राहता तालुक्यातील राजुरी येथे बिरोबा महाराज यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विधिवत पूजा करताना राजुरी गावचे उपसरपंच डॉ सोमनाथ पाटील गोरे व ग्रामस्थ दिसत आहे                                      (छाया विजय बोडखे राजुरी)

Post a Comment

0 Comments