दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.23- यावर्षीच्या सर्वाधिक तापमानाची नोंद बुधवारी घेण्यात आली. बुधवारी सोयगावचे तापमान 42 अंशांवर चढले होते.
हवामान विभागाने पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे तालुका प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.गत आठ दिवसांपासून सोयगावचे तापमान 40.2, 41.3, 41.4 आणि मंगळवार पासून 42.5 अंशांपर्यंत तापमान पोहोचले होते. हे तापमान कमी-अधिक प्रमाणात कायम होते. बुधवारी सोयगाव तालुक्यात उन्हाचा पारा 42 अंशांपर्यंत वर चढला होता. यामुळे जनजीवन प्रभावित झाले.सततच्या वाढत्या तापमानाने गावपातळीवरील कामाच्या वेळा बदलल्या आहेत. शेतकऱ्यांची मशागतीची कामे खोळंबली आहेत. उन्हाळी पिकांची निंदणीच्या कामाला ब्रेक लागला आहे. वाढत्या उन्हामुळे शेतकऱ्यांनी आगामी खरिप हंगामाच्या पूर्वतयारी ची कामे थांबविली आहेत. सकाळी अथवा सायंकाळी शेतशिवारात शेतकऱ्यांकडून मशागतीच्या कामाला गती दिली जात आहे.
---पुढील दोन दिवस उन्हाचे
पुढील दोन दिवस उन्हाचे आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी 12 ते 4 यावेळेत बाहेर पडू नये, अशा सूचना तालुका प्रशासनाच्या वतीने दिल्या जात आहेत. शक्यतोवर दैनंदिन कामकाज सकाळच्या सत्रात करावे.
दुपारी 4 नंतर घराबाहेर पडावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या उन्हाचा त्रास हा लग्नसोहळ्याला जाणाऱ्यांना होत आहे. वृद्ध व लहान मुलांनी विशेष खबरदारी घ्यावी, असेही सांगण्यात येत आहे.
0 Comments