जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांमध्ये मधमाश्यांच्या हल्ल्यात अनेक पर्यटक जखमी --



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.22- सोयगाव तालुक्यातील जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा लेण्यांना भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर लेणी क्रमांक 26  जवळ बसलेल्या मधमाश्यांनी अचानक हल्ला केल्याची घटना दि.22 मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.  मधमाश्यांच्या या हल्ल्यात 5 ते 6  देशी-विदेशी पर्यटक जखमी झाले असून  हल्ल्यात थायलंडमधील पर्यटकही जखमी झाले त्याला एका स्ट्रेचर वर खाली आणण्यात आले आणि नंतर रुग्णवाहिकेतून अजिंठा येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

            जगप्रसिध्द अजिंठा लेणीच्या  4,10 व  26  जवळ मधमाश्या पोळ बसले होते. पर्यटक लेणी पाहण्याचा आनंद घेत असताना दुपारी 4 वाजेच्या सुमारास लेणी क्रमांक 26 च्या  प्रवेशद्वाराबाहेर बसलेल्या मधमाश्यानी   भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर अचानक हल्ला केल्याने  पर्यटकांनी मधमाश्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी धाव घेतली.त्याच वेळी पर्यटकांना मदत करण्यासाठी, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे कर्मचारी आणि SIS सुरक्षा रक्षकांनी या देशी आणि परदेशी पर्यटकांना वाचवले.
या पर्यटकांचे शरीर कापडाने झाकून मधमाश्यांपासून संरक्षण केले. फर्दापूर टी-पॉइंटवर उभ्या असलेल्या मोफत सेवा जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या ड्रायव्हर काशिनाथ नरोटे यांना  रुग्णवाहिका घेऊन पाचारण करण्यात आले.  थायलंडहून आलेल्या महिला पर्यटकाला रुग्णवाहिकेत बसवून अजिंठा येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना मधमाशांचा हल्ल्यापासून वाचविण्यासाठी पुरातत्व खात्याने मधमाश्यांच्या पोळ्यांसाठी व्यवस्था करावी, अशी मागणी पर्यटकांमधून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments