टाकळीभान (प्रतिनीधी) – श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील शेतकरी कुटुंबातील अक्षय अशोक शेळके यांची नाशिक कृषीआयुक्तालय येथे महसूल सहायक अधिकारी पदी निवड झाली.
भोकर येथील जगतापवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे त्याचे प्राथमिक शिक्षण झाले. तर माध्यमिक शिक्षण श्री जगदंबा प्रासादिक विद्यालय येथे नंतर उच्च माध्यमिक शिक्षण श्रीरामपूर येथील बोरावके महाविद्यालयात झाले. जिद्द व चिकाटीच्या जोरावर अक्षयने शासकीय कोट्यातून अकलुज येथील रत्नाई कृषी महाविद्यालय येथे कृषी विभागातील बीएस्सी पदवी प्राप्त केली. येथे ही याच चिकाटीच्या जोरावर पुन्हा एमएस्सी साठी त्यांनी शासकीय कोट्यातून कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय येथील उच्च पदवी प्राप्त केली. त्यानंतर पुणे येथे एमपीएससीमध्ये चांगल्या श्रेणीत उत्तीर्ण होवून नुकत्याच लागलेल्या निकालानंतर त्यांची नाशिक येथील कृषी आयुक्तालय येथे महसूल सहायक या पदावर नियुक्ती झाली आहे. येथील भाऊसाहेब तुकाराम शेळके यांचा नातू व अशोक भाऊसाहेब शेळके यांचा तो मुलागा असून भाजपाचे अण्णासाहेब शेळके व सामाजीक कार्यकर्ते दीपक शेळके यांचा तो पुतण्या आहेत. या यशाबद्दल त्याचे विविध स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
0 Comments