दिलीप लोखंडे
टाकळीभान- भोकर विविध कार्यकारी सोसायटीच्य अध्यक्षपदी माजी आमदार भानुदास मुरकुटे गटाचे महेश पुंजाहरी पटारे यांची तर उपाध्यक्षपदी करण ससाणे गटाच्या सागर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
भोकर विविध कार्यकारी सोसायटीमधे मुरकुटे ससाणे गटाची सत्ता आहे.अध्यक्ष बाबासाहेब तागड उपाध्यक्ष सुमन मते यांनी रोटेशन पद्धतीनुसार राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर नव्याने निवड करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदासाठी माजी उपसरपंच महेश पुंजाहरी पटारे यांच्या नावाची सुचना गणेश छल्लारे यांनी मांडली.त्यास अनुमोदन कारभारी तागड यांनी दिले तर उपाध्यक्षपदासाठी सागर सुरेश शिंदे यांच्या नावाची सुचना बाबासाहेब तागड यांनी मांडली.त्यास निलेश विधाटे यांनी अनुमोदन दिले.दोन्ही पदासाठी एक एक अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी संदीप रुद्राक्ष यांनी दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली.
यावेळी अशोक कारखान्याची माजी उपाध्यक्ष पुंजाजी शिंदे,अशोक बेग, भागवत पटारे,रामदास शिंदे, भाऊराव सुडके,सतीश शेळके, सुरेश अमोलिक,नानासाहेब जगदाळे,पंढरीनाथ मते,ठकसेन खंडागळे,संदीप गांधले,गिरीश मते,विनोद डुकरे,संजय पटारे, आदी उपस्थित होते.प्रास्ताविक व सुत्रसंचलन गणेश छल्लारे यांनी केले.
यावेळी नुतन अधिकार्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
0 Comments