कमलपूर येथे आरो फिल्टर वॉटरचे भव्य उद्घाटन




टाकळीभान प्रतिनिधी- कमालपूर येथे आरो वॉटर फिल्टर चे उद्घाटन  माननीय माजी आमदार भानुदास जी मुरकुटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली  माननीय आमदार श्री हेमंत तात्या उगले यांच्या शुभहस्ते पार पडला. या कार्यक्रमासाठी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक करण दादा ससाणे, साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन दादा गुजर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली मुरकुटे, अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक नीरज भैया मुरकुटे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भास्करराव दादा मूरकुटे कामगार नेते गणेशराव छलारे, कमालपूर सोसायटीचे चेअरमन दिगंबर पा. बारस्कर, आदी मान्यवर उपस्थितीत पार पडला .


या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कचरू मामा गोरे यांनी भूषवले प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य अँड. राहुल बारस्कर यांनी केले व अध्यक्ष सूचना मांडली त्या सूचनेस सुजित मुरकुटे यांनी अनुमोदन दिले यावेळी माननीय आमदार हेमंत तात्या उगले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कमालपूर गावासाठी भरभरून निधी उपलब्ध करून देण्याचे कबूल केले यावेळी बोलताना कमालपूर येथील मानुभाव पंथाची काशी म्हणून ओळखले जाणारे श्रीकृष्ण मंदिर,तसेच शीख धर्मीयांचा गुरुद्वारा तसेच वारकरी संप्रदायाचे दक्षिणमुखी हनुमान मंदिर या सारखे महा तिर्थक्षेत्र असल्या मुळे  क वर्गाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी सरकार दरबारी आपण स्वतः लक्ष घालून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे टाकळीभान ते कमालपुर, भोकर ते कमालपूर, माळवाडगाव ते कमालपुर हे सर्व रस्ते सुसज्ज करणार आहे हा रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर आपण मार्गी लावून मंजूर करणार आहे असे आश्वासन दिले कमलपूर हे गाव तीर्थ विकास क्षेत्रामध्ये समाविष्ट झाल्यास निश्चितल कमालपूर गावाचा विकास मध्ये भर पडणार आहे व  आजूबाजूचे गाव यांना देखील याचा  निश्चितच फायदा होणार आहे.

 यावेळी करण दादा ससाने आपल्या भाषणांमध्ये माननीय मुरकुटे साहेब त्यांच्या आठवणींना उजाळा दिला साहेबांचे गावाविषयी असलेले प्रेम तो जिव्हाळा याची आठवण करून दिली तसेच सचिन दादा गुजर यांनी आपल्या भाषणामध्ये माननीय मुरकुटे साहेब माननीय भास्कर दादा मुरकुटे यांच्याबरोबर पूर्वी काम करत असताना आलेले अनुभव तसेच मुरकुटे साहेबांनी तालुक्याच्या पाण्यासाठी केलेला संघर्ष या सर्व जुना आठवणींना उजाळा दिला त्याचबरोबर माऊली मुरकुटे यांनी यांच्या भाषणामध्ये कमालपूर शिवारात विकास कामाप्रती असलेले कटिबद्धता व्यक्त केली यावेळी भास्कर दादा मुरकुटे यांनी आपल्या भाषणांमध्ये काही राजकीय खुलासे केले माननीय ऊपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याशी काही राजकीय चर्चा झाली ही जनतेसमोर मांडली व अष्टशताब्दी महामार्गाला कमालपूर हे गाव जोडावे अशी आमदार साहेबांना विनंती केली यावेळी माजी सरपंच सचिन भाऊ मुरकुटे यांनी आरो फिल्टर बाबत माहिती दिली व शुद्ध पाण्याचे महत्व सांगितले, कमलपुर ही गाव क वर्गात समाविष्ट करावे ही मागणी केली त्यासाठी माननीय आमदार साहेबांनी सर्व तरी प्रयत्न करावे ही विनंती केली व भावी विकास कामाचा आराखडा सांगितला, व नीरज भैया मुरकुटे यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे सर्व उपस्थित यांचे आभार मानले , यावेळी सरपंच स्वातीताई सचिन मुरकुटे, उपसरपंच ललिता ताई गोरे, ग्रामपंचायत सदस्य राहुल बारस्कर, नंदू शिरसाट, किरण गोरे, सुवर्णाताई गोरे, उषाताई करपे, जिजाबाई जाधव, ग्रामसेवक सतीश शिंदे  कमालपुर सोसायटीचे व्हाईस चेअरमन  वाल्मीक पा. गोरे ज्येष्ठ नागरिक नामदेव नाना मुरकुटे, दिलीप मुरकुटे, रमेश मुरकुटे, बाळासाहेब मुरकुटे, अनिल गोरे, सुभाष गोरे, सूर्यभान मुंजाळ, रवींद्र गोरे, शिवाजी गोरे, प्रभाकर गोरे, संभाजी गोरे, सचिन मुरकुटे, अमोल मुरकुटे, वैभव भोरे, बाळासाहेब गोरे, मच्छिंद्र गोरे, प्रकाश गोरे, प्रवीण गोरे, गणेश बारस्कर, दीपक गोरे, सतिश बारस्कर, रवी गोरे, अविनाश बारस्कर, मुक्तेश्वर मुरकुटे, किशोर उदरभरे, दत्तात्रय गोरे, दिपक मुरकुटे, केतन मुरकुटे, शुभम मुरकुटे, बबन गोरे, निखिल पवार, मनोज गोरे, अजित मुरकुटे,रामा दवंगे, रावसाहेब शिरसाट, आबासाहेब शिरसाठ, अकब पठाण, दिपक बर्डे, सिंधुताई मुरकुटे, मंदाकिनी मुरकुटे, भारती गोरे, हिराताई मुरकुटे, प्रमिलाबाई गोरे, आदि ग्रामस्थ उपस्थित होते...
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप लोखंडे टाकळीभान यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)

Post a Comment

0 Comments