अभिजात मराठी भाषेचे सौंदर्य व प्रतिष्ठा साहित्य संमेलनातून जोपासली जाते ... प्रा.डॉ.केशव देशमुख(टाकळीभान येथील तिसरे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात व थाटात संपन्न )

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी - साहित्य संमेलनाच्या आयोजनांमधून भाषेचे सौंदर्य व प्रतिष्ठा जोपासली जाते, व साहित्यिकांकडून या भाषेच्या सेवेचे व्रत जपले जाते ही आपल्या भाषेच्या दृष्टिकोनातून भूषणावह बाब असल्याचे  प्रतिपादन शासनाच्या भाषा समितीचे सदस्य सुप्रसिद्ध लेखक व कवी प्रा. डॉ. केशवराव देशमुख यांनी केले. 
   यावेळी ते ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळीभानच्या वतीने आयोजित तिसरे राज्यस्तरीय मराठी  ग्रामीण साहित्य संमेलन कार्यक्रम प्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते.  यावेळी उपस्थितांना  मार्गदर्शन करताना देशमुख  बोलताना म्हणाले की मराठी भाषा आपल्या जिभेवरील भाषा असून आपली देहबोली ,प्रसंग या भाषेतून सहज प्रकटतील अशी आपली मराठी मातृभाषा आहे. या भाषेला प्राचीन इतिहास व परंपरा असून संत ,महंत यांचे साहित्य, ग्रंथ, अभंग, ओव्या, किर्तन ,प्रवचन,चरित्र लेखन, लीळा चरित्र यातून समाजापुढे भाषेचे प्रबोधन करण्यात आले आहे. मराठी भाषा अभिजात आहेच शासनाने अधिकृत अभिजात मराठी भाषेचा दर्जा देऊन या भाषेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. सध्या प्रत्येक शासकीय कार्यालयांना मराठी भाषेतून माहिती देणे, कामकाज करणे शासनाने अनिवार्य केले आहे. साहित्य संमेलना मधून या भाषेचा प्रचार प्रसार होऊन तिची थोरवी व गोडवी गायली जाते. इतर भाषांचे आपल्यावर जास्त अतिक्रमण होत आहे, सध्या मोबाईल युगामध्ये संवाद हरवत चालला असून आपल्या भावना व विचार व्यक्त करण्यासाठी संमेलनाशिवाय पर्याय नाही. कवी लेखकांनी मुक्तपणे लेखन करून आपल्या साहित्यातून व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे व हा साहित्याचा तेजोमय रथ निरंतर चालू राहील याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. आपली मायबोली मराठी भाषा ही जतन ठेवणे आपल्या पिढीची जबाबदारी असून साहित्य संमेलना मध्ये भाषेचा अलंकारिक श्रृंगार वाढून लौकिक वाढतो. त्यामुळे ही संमेलने घेणे काळाची गरज आहे. देशमुख म्हणाले.
           यावेळी आ. हेमंत ओगले बोलताना म्हणाले की साहित्य, शिक्षण आणि सेवाकार्य पुरस्कार वितरण ही सेवासंस्कृती आहे.मी अशा साहित्य संमेलनात प्रथमच प्रमुख पाहुणा म्हणून बोलत असून मराठी भाषा, साहित्यिक, शिक्षक, समाजातील गुणवान मान्यवरांची दखल घेणारे अर्जुन राऊत यांची ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था साहित्यक्षेत्रात भूषणावह असल्याचे मत श्रीरामपूर विधान परिषदेचे आ. हेमंत ओगले यांनी व्यक्त केले.
   श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील विठ्ठल-रुक्मिणी माधव मंगल कार्यालयात ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेतर्फे तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आणि राज्यस्तरीय उत्कृष्ठ मराठी अध्यापन व साहित्यसेवा कार्यगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आ. ओगले बोलत होते. या संमेलनाचे उद्घाटन नाशिक येथील कविवर्य कुसुमाग्रज यांच्या मानसकन्या आणि ज्येष्ठ लेखिका रेखाताई भांडारे यांनी केले. दीपप्रज्वलन आणि श्रीसरस्वती प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. 

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील राज्य शासन भाषा समिती व मराठी विद्यापीठ स्थापना समिती सदस्य सुप्रसिद्ध भाषातज्ज्ञ आणि समीक्षक डॉ. केशव सखाराम देशमुख, श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे उपस्थित होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष कविवर्य प्रा. पोपटराव पटारे पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून टाकळीभान गावाचा सांस्कृतिक इतिहास सांगितला. संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष,संयोजक अर्जुन राऊत यांनी प्रास्तविक करून अध्यक्षीय सूचना केली तर ज्येष्ठ समीक्षक, प्रकाशक साहित्यिक डॉ. शिवाजी काळे यांनी अनुमोदन दिले.अभिजात मराठी भाषा परिसंवादाचे प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी भाषा अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे, सावित्रीबाई फुले मराठी अभ्यास मंडळाचे समीक्षक प्राचार्य डॉ.शिरीष लांडगे, धुळे येथील जल अभ्यासक भिला सोनू पाटील, महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे, संगमनेर येथील रोटरी क्लब व पर्यावरण संचालक सुनील माधवराव घुले, निसर्ग व सामाजिक पर्यावरणप्रदुषण निवारण मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष प्रा. संतोष परदेशी आदिंची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी संमेलनातून आपले विचार मांडून शुभेच्छा दिल्या. सिन्नर येथील ज्येष्ठ कवयित्री व लेखिका सुनीताताई वाळुंज यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. नेवासा येथील संत ज्ञानेश्वर संस्थानचे खजिनदार विश्वस्त ज्ञानेश्वरमाऊली शिंदे यांनी शुभचिंतन व्यक्त केले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या' साहित्याचे दीपस्तंभ' या पुस्तकाचे प्रकाशन आमदार हेमंत ओगले आणि मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. डॉ. उपाध्ये यांनी अभिजात मराठी भाषेचे महत्व सांगितले.छत्रपती  संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव जिगे यांच्या        अध्यक्षतेखाली समारोप सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी ह.भ.प. दत्तात्राय बहिरट महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे मा.सदस्य राजाराम सोनटक्के, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य सचिव प्रा. डॉ.अनिल लोखंडे सर, मराठी बालभारती पुणे मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील, आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी अनेक गुणवंत साहित्यिक, शिक्षक, समाजसेवक यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संमेलन उद्घाटक रेखा भांडारे यांनी कविवर्य कुसुमग्रज यांच्या आठवणी सांगून अर्जुन राऊत यांचे कौतुक केले. संमेलन अध्यक्ष डॉ. केशव देशमुख यांनी अभिजात मराठी भाषेचे सामर्थ्य विशद करून मराठीचा सर्वत्र वापर झाला पाहिजे अशी भूमिका अपेक्षा व्यक्त केली. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून समाजातील विचारप्रवाह प्रवाह बाहेर पडून, संवादाला वाचा फुटते तसेच मानवी जीवनाच्या भाव भावनांच्या विविध छटांचे दर्शन साहित्य संमेलनातून घडत असते.डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी आजचे साहित्यिक आणि भाषा याविषयी विचार मांडले. आमदार ओगले यांनी यापुढे अर्जुन राऊत यांना सर्व प्रकारचे सहकार्य करू असे आश्वासन दिले. संस्थेचे उपाध्यक्ष संदीप पटारे ग्रामस्थ, मित्रपरिवाराने नियोजन केले. बापुसाहेब तनपुरे, सुरेखा घोलप, कवयित्री संगीता फासाटे, वर्षा भोईटे यांनी सूत्रसंचालन केले. पत्रकार प्रकाश कुलथे यांनी आभार मानले. पसायदानाने संमेलनाची सांगता झाली. कार्यक्रम प्रसंगी साहित्यिक ,कवी, व अनेक मान्यवर यांनी उपस्थिती व संमेलनाला शुभेच्छा यामध्ये मा. सभापती नानासाहेब पवार, मा. उपसरपंच राजेंद्र कोकणे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पटारे, विलास दाभाडे,  ज्येष्ठ ग्रामस्थ श्रीधर गाडे,सोमनाथ पाबळे, बंडोपंत बोडखे, जितेंद्र छल्लारे, अमोल पटारे,दगडू गायकवाड, नवनाथ पवार, रतिलाल राजळे,  ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे, अशोकराव रणनवरे आदींसह पत्रकार बांधव व साहित्य प्रेमी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत, उपाध्यक्ष संदीप पटारे, भैया पठाण, अक्षय कोकणे, सुदाम पटारे, सुजित बोडखे, रवींद्र पटारे, गोराणे सर,सतीश गायकवाड, दीपक वाघ, मनोज मगर, कैलास मते,आदी सह मंडळाचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.

(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप लोखंडे टाकळीभान यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)

Post a Comment

0 Comments