सोयगावात गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रम संपन्न, भाविकांची दर्शनासाठी रीघ--



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.20- शहरात गजानन महाराज मंदिरात मोठ्या उत्साहात गुरुवारी गजानन महाराज प्रगटदिन विविध धार्मिक कार्यक्रमानी साजरा करण्यात आला.


 सकाळी श्रींचे प्रगट दिनानिमित्त पहाटे महाराजांना मंगल स्नान,मंत्रोक्त अभिषेक औक्षण करून प्रगट दिनाला सुरुवात करण्यात आली दुपारी बारा वाजता महा आरती,व श्री गजानन महाराज बावनी पठण करून नामजप करण्यात आला त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली गजानन महाराज मंदिर परिसरात भाविकांची दर्शनासाठी रांग लागली होती दरम्यान भाविकांनी गजानन विजय ग्रंथ पारायण केले. 
----मंदिर परिसरात शिवाजी नगर भागात मंत्रांचा जप-
शिवाजी नगर परिसरात असलेल्या गजानन महाराज मंदिर परिसरात गुरुवारी गण गण गणात बोते या मंत्र जपाने परिसर दणाणून गेला होता यावेळी मंदिर समितीच्या वतीने भाविकांना महाप्रसाद देण्यात आला होता.शहर वासीयांनी कार्यक्रम यशस्वीते साठी पुढाकार घेतला होता(.सहयोगी पत्रकार दिलीप शिंदे सोयगाव)

Post a Comment

0 Comments