राहाता तालुक्यातील राजुरी येथील जुन्या पिढीतील गं. भा .अंजनाबाई नाना पठारे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने 105 व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली,सुना, जावई, नातवंडे, नातू,नाती, असा परिवार असून गोपीनाथ नाना पठारे यांच्या त्या मातोश्री व प्रवरा बँकेचे माजी संचालक मारुती पाटील गोरे यांच्या त्या सासू तसेच राजुरी गावातील जेष्ठ कार्यकर्ते एकनाथ त्रिंबक बेंद्रे पाटील यांच्या त्या भगिनी होत्या.त्यांच्यावर राजुरी येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक अध्यात्मिक क्षेत्राबरोबर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
0 Comments