दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.18 - हिंदवी स्वराज्याचे जनक, जगातील पहिले वृक्ष धोरण, शिवकालीन जल व्यवस्थापन करनारे, गड कोट व पर्यावरण संवर्धन करणारे राजे म्हणून छत्रपती शिवाजी राजे महाराज यांची जगभर ख्याती आहे.
महाराज आणी गडकोट यांचे अतूट नाते लक्षात घेता त्यांच्या कार्यास अभिनव पद्धतीने अभिवादन व गडकोटावरील स्वछता, वन्यजीवांना अपाय होऊ नये म्हणून सिल्लोड व बहुली येथील डॉ. संतोष पाटील, दीपक सुर्वे, भाऊसाहेब निकोत, भिकन सोन्ने यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला सिल्लोड तालुक्याच्या उत्तरेस असलेल्या जंजाळा ज्यास वैशागड किल्ला म्हणतात तिथे स्वच्छता अभियान राबवून गडावरील प्लास्टिक बॉटल, कॅरी बॅग, खाद्य पदार्थ वेष्टन, गुटखा च्या पुड्या ई. प्लॅस्टिक जमा करून किल्ला प्लॅस्टिक मुक्त केला. या किल्ल्यावर 4 तलाव असून त्यावर अनेक वन्यजीव विसंबून असतात, त्यांना अपाय होऊ नये म्हणून त्यातील प्लॅस्टिक ही जमा करण्यात आले.गडावर येणाऱ्या पर्यटक व स्थानिकांनी येथे सोबत आणलेले प्लास्टिक, सिगारेट, आगपेटी येथेच सोडून न जाता सोबत परत न्यावे असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.(सहयोगी पत्रकार दिलीप शिंदे सोयगाव)
0 Comments