दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.18--तालुक्यातील बनोटी सह पाच गावातील महिलांना मंगळवारी गटविकास अधिकारी दादाराव अहिरे यांच्या हस्ते ई पॉज मशीन वितरण करण्यात आले.
सोयगाव पंचायत समितीच्या उमेद मार्फत महिलांना बँकिंग व्यवसायात अग्रेसर होण्यासाठी तालुक्यातील बनोटी, हनुमंत खेडा,गोंदेगाव,फरदापुर आणि शिंदोळ येथील प्रतिभा योगेश निकम( बनोटी)शुभांगी विनोद बोराडे (फरदापुर)ज्योती निलेश सोनवणे (गोंदेगाव) धनश्री दत्तात्रेय निकम( हनुमंत खेडा ), माधुरी प्रकाश महाजन (शिंदोळ) या पाच महिलांना ई पॉज मशीन देण्यात आले यावेळी तालुका अभियान कक्ष अधिकारी तुषार बरगट, तालुका व्यवस्थापक सखुबाई पवार, सत्यजित राठोड, प्रेमनाथ राठोड, सज्जन बिल्लारी आदींची उपस्थिती होती..
(सहयोगी पत्रकार दिलीप शिंदे सोयगाव)
0 Comments