महाराष्ट्र राज्याचे राज्य पुष्प व हरीत मान चिन्ह असलेल्या " जारूळ" च्या संवर्धनासाठी राज्यास दिशादायी उपक्रमास सिल्लोड येथून सुरुवात, तालुक्यातील प्रत्येक शाळेत होत आहे जारूळ रोपण--



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.03- - जारूळ - ताम्हण वृक्षाच्या फुलाला महाराष्ट्र राज्याचे " राज्य पुष्प " व हरीत मान चिन्ह म्हणून  शासनाने दर्जा दिला आहे. जारूळ बद्दल अजून ही राज्यवासिय परिचित नाही. या जैववीधतेस उपयोगी असणाऱ्या वृक्षाचे संवर्धन व रोपण व्हावे म्हणून सामाजिक वनिकरन विभाग, सिल्लोड व  अभिनव प्रतिष्ठान चे डॉ. संतोष पाटील यांनी तालुक्यातील प्रत्येक शाळेत जारूळ रोपणाचा उपक्रम हाती घेतला आहे.

 असा हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे.या निमित्ताने आज जि.प.शाळेच्या शिक्षकांना ही रोपे वितरित केली आहेत. डॉ. पाटील यांनी  वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहून विनंती केली आहे की राज्यातील प्रत्येक शाळेत राज्याच्या राज्य पुष्प वृक्षाचे रोपण व्हावे असा प्रयत्न व उपक्रम वनविभाग व शिक्षण मंत्रालय यांनी राबवावा.यात सहभागी शाळांना वनमंत्री यांचा संदेश असलेले सहभाग प्रमाण पत्र ही अभिनव प्रतिष्ठान व सामाजिक वनिकरन विभाग यांचे वतीने देण्यात येणार आहे. वन क्षेत्रपाल एस. बी.तांबे,वनरक्षक जि.बी.राजपूत, व पूजा राजपूत,सिल्लोड यांचे मौलिक सहयोग लाभले आहे. या कार्यासाठी शिक्षकसंघ व शिक्षक सेनेच्या राहुल पवार,शशिकांत सावंत, संदिप बडक, रणजित खेडेकर, विजय काकडे, ज्ञानेश्वर पटवारी,दत्तात्रय चव्हाण,अनिकेत राऊत, प्रदीप बिडकर, विलास गव्हाले, रुपेश भाले, बालू गोराडे,अरुण पाटील हे शिक्षक हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.   
        ---एकच लक्ष, शाळा तिथे जारूळ वृक्ष---जारूळ चे वैशिष्ट्य काय - या वृक्षाचे लाकूड पाण्याने विशेषतः समुद्राच्या पाण्याने खराब होत नाही, म्हणून मराठा आरामाराचे जनक असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे होड्या, तराफे निर्माण करण्यासाठी या वृक्षाचा उपयोग करत. या फुलांवर अनेक मधमाशा, कीटक, फुलपाखरे मधप्राशन करतात. याची फळे लाल छातीचा पोपट, बुलबुल ई. पक्षी खातात. याच्या पानांवर ओक ब्ल्यू, सेंट्रल ब्ल्यू ओक या प्रजातीची हा होस्ट प्लॅन्ट असून ही फ़ुलपाखारे यावर अंडी घालतात.रोपांसाठी आम्हास संपर्क साधावा असे आवाहन डॉ. संतोष पाटील यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments