गुजरवाडी शिवारातील भक्षच्या शोधात असताना बिबट्या पडला विहिरीत

टाकळीभान प्रतिनिधी - श्रीरामपूर तालुक्यातील गुजरवाडी शिवारातील भक्षच्या शोधात असताना बिबट्याचा  अचानक तोल जाऊन रविवारी रात्रीच्या दरम्यान विहिरीत पडला.


 याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुजरवाडी शिवारातील विठू पिसाळ  यांच्या गट नंबर 61 मधील विहीर   असून रविवार रात्री 12 वाजेच्या दरम्यान  एक बिबट्या शिकारीचा  शोध घेत असताना विहिरीत पडला पण विहीर खोल असताना त्याला वर येताना अशक्य झाले होते परंतु रात्रभर जीवाची यातना करत एका इलेक्ट्रिक मोटारीच्या केबलचा आधार घेत तग धरून बसून होता परंतु त्याचा डरकाळीचा आवाज शेतकरी विठू मिसाळ यांना आल्याने त्यानी तीन फेब्रुवारी सकाळी  लागलीच पत्रकार यांना भ्रमणध्वनी  करून  आमच्या विहिरीत एक बिबट्या पडला आहे तो जिवंत आहे. तरी त्याचा जीव वाचवण्यासाठी  फॉरेस्ट अधिकारांना तातडीने कळवा. पत्रकार दिलीप लोखंडे यांनी याबाबत फॉरेस्ट अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी करून सविस्तर माहिती दिली. फॉरेस्ट धर्मवीर सालविठ्ठल, सहाय्यक वनरक्षक गणेश मिसाळ, वन परिक्षेत्र अधिकारी युवराज पाचारणे, श्रीरामपूर तालुक्यातील वनरक्षक  अधिकारी अक्षय अंकुश बडे व प्राणी मित्र मंजा बापू खेमनर तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने जिवंत बिबट्या  बाहेर काढून पिंजऱ्यामध्ये जर बंद केले.


Post a Comment

0 Comments