घोरकुंडच्या महिलांचा पिण्याच्या पाण्यासाठी सोयगाव तहसील वर धडक हंडा मोर्चा,तालुका प्रशासनाचा एकही अधिकारी हजर नाही--




दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.06 - सोयगाव तालुक्यातील घोरकुंड गावात गेल्या दोन महिन्यांपासून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

 ग्रामपंचायत च्या पाणी पुरवठा विहिरीवर एका शेतकऱ्याने ताबा घेऊन सदर विहीर ही माझी असल्याचा दावा केल्या मुळे या विहिरींवरील ग्रामपंचायत च्या पाणी पुरवठा ठप्प केल्या ने घोरकुंड गावचे काही ग्रामस्थ दि.04 पासून उपोषणाला बसले परंतु तालुका प्रशासनाने कोणत्याही प्रतिसाद न दिल्याने गुरुवारी त्या उपोषणाच्या समर्थनार्थ व पिण्याच्या पाण्यासाठी घोरकुंड येथील सरपंच नंदाताई पवार यांच्या नेतृत्वाखाली थेट तहसील वर धडक हंडा मोर्चा काढून त्या ठिकाणी पाच तास ठिय्या मांडला, परंतु गुरुवारी गटविकास अधिकारी हे गंगापूर येथे चौकशी साठी तर तहसीलदार मनीषा मेने या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी गेल्या चे सांगण्यात येऊन या महिलांच्या हंडा मोर्चा कडे पाच तास दुर्लक्ष करण्यात आले. 

  शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महिलांच्या निघालेला हंडा मोर्चा दुपारी साडे बारा वाजता सोयगाव पंचायत समिती कार्यालयात पोहचला त्या ठिकाणी सहायक गटविकास अधिकारी तात्याराव माळी यांना निवेदन देऊन थेट सोयगाव तहसील कार्यालयात संतप्त महिला धडकल्या नायब तहसीलदार संभाजी देशमुख यांना लेखी निवेदन दिले मात्र यावर उपाय योजना होईपर्यंत ठिय्या मांडण्याचा निर्णय या संतप्त महिलांनी घेतला त्यामुळे सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाच तास या महिलांनी हंडे वाजवून तालुका प्रशासनाचा निषेध केला.

    ----काय आहे प्रकरण----
घोरकुंड गावाला गेल्या चाळीस वर्षापासून एकाच विहिरीवरून ग्रामपंचायत चा पाणी पुरवठा होत होता त्या विहिरीवरून शासनाच्या दोन पाणी पुरवठा योजना ही सुरू आहे मात्र एका शेतकऱ्यांने ती विहिरी माझी असल्याचा दावा करून ग्रामपंचायत च्या पाणी पुरवठा यंत्रणा बंद करून विहिरीचे पाणी पिकासाठी वापरुन गावास वेठीस धरत आहे त्यामुळे दोन महिन्यांपासून घोरकुंड गावाचा पाणी पुरवठा ठप्प झाल्या मुळे गावात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे त्यावर तोडगा काढण्यासाठी सरपंच पती संतोष पवार यांच्यासह दहा ते बारा ग्रामस्थ सोयगाव तहसील समोर उपोषणाला बसले मात्र या उपोषण कडे तालुका प्रशासनाने काना डोळा केल्या ने घोरकुंड येथील सरपंच नंदाताई पवार यांच्या नेतृत्वाखाली दोनशे महिलांनी गुरुवारी हंडा मोर्चा काढला सरपंच नंदाताई पवार, वर्षा पाटील,कविता पाटील,कविता साबळे, कौशल्याबाई आघाडे, भारती बाई साबळे, शारदा चव्हाण, कविता पठाडे,सविता साबळे, उशाबाई काकडे,मंदाबाई साखले, पुष्पां बाई बनकर,मनीषा बनकर,ताजना बाई तडवी,ज्योती साबळे,रत्ना बनकर,मथुराबाई पाटील,संगीता काकडे,अनिता पाटिल, निर्मलाबाई आघाडे, रमा बाई आघाडे, जिजाबाई लांडगे,विमल बाई सहाने,शांताबाई पांढरे,आदींसह दोनशे महिलांनी पाच तास ठिय्या मांडला होता 
     ----तहसीलदार, गटविकास अधिकारी नसल्याने या महिलांच्या मोर्चा वर मार्ग काढता येत नव्हता त्यामुळे नायब तहसीलदार संभाजी देशमुख यांनी थेट गटविकास अधिकारी दादाराव अहिरे यांचे महिलांसोबत फोन वरून बोलणे करून दिले त्यावेळी गटविकास अधिकारी यांनी मी स्वतः शुक्रवारी घटनास्थळी येऊन मार्ग काढून देतो असे आश्वासन दिले मात्र तरीही आक्रमक महिलांनी आधी पाणी द्या या मागणीवर ठाम राहिल्या अखेर सायंकाळी पाच वाजता सहायक गटविकास अधिकारी तात्याराव माळी यांनी आश्वासन दिल्या ने हंडा मोर्चा ची माघार घेण्यात आली मात्र उपोषण कायम सुरू होते.
     -गटविकास अधिकारी दादाराव अहिरे यांनी दि.05 बुधवारी सदर उपोषण हे राजकीय सुडातून असल्याचे वक्तव्य केले होते या वक्तव्याचा या महिलांनी निषेध करून त्या गटविकास अधिकारी यांचेवर कारवाई प्रस्तावित करण्याची मागणी लावून धरली आहे.

Post a Comment

0 Comments