कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, शिंदोळ गावातील सायंकाळी सहा वाजेची घटना--



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.06- खरिपासह रब्बीच्या पिकांसाठी घेतलेले कर्ज फेडण्याची चिंता आणि शेती पंपाच्या वीज पुरवठ्या अभावी सुकलेली रब्बीचे पिकं व केळी बागा या चिंतेमुळें दि.06 गुरुवारी राहत्या घरात गळफास घेऊन शेतकऱ्याने आत्महत्या केली.



      राजेंद्र भगवान इंगळे(वय 53) रा.शिंदोळ ता.सोयगाव असे गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे त्यांच्याकडे एक हेक्टर शेती आहे त्यांनी केळी बागा सह रब्बीच्या मक्याची लागवड केली आहे परंतु सध्या शेती वीज पंपाची या भागात मोठी समस्या भेडसावत असून केळी सह रब्बीचे मका पिके सुकत आहे त्यामुळे शेतीवर काढलेले सोसायटीच्या कर्जासह इतर खासगी कर्ज फेडण्याची चिंता लागून असल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा, एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे. दि.07 शुक्रवारी सकाळी अकरा वाजता त्यांचे वर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
-----सोयगाव तालुक्यात कर्जाच्या विवंचनेत जानेवारी महिन्यात दोन आणि फेब्रुवारी महिन्यात एक अशा तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद महसूल विभागाकडे झाली आहे.



Post a Comment

0 Comments