दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.06 - सोयगाव शहरात नगर पंचायतच्या वतीने देण्यात आलेल्या स्वच्छता ठेका यामधून सफाई कर्मचारी वगळण्याच्या कारणावरून ठेकेदार आणि सफाई कर्मचाऱ्यांमध्ये जुंपली होती.
त्यामुळे वीस दिवसा पासून शहरात स्वच्छता होत नसल्याने शहरात झालेल्या दुर्गंधी आणि सफाई कर्मचाऱ्यांना अद्यापही देण्यात न आलेल्या बावीस दिवसांच्या प्रलंबित वेतानाच्या कारणावरून गुरुवारी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा गट, काँग्रेस आदी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिक नगर पंचायती वर कुलूप ठोकण्यासाठी धडकले मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पदाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम दराडे,संबंधित ठेकेदार आदी मध्ये फोन वरून चर्चा घडवून तोडगा काढण्यात आला मात्र यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम दराडे उपस्थित नसल्याने बांधकाम अभियंता अभिजीत सहाने यांनी अखेर शुक्रवारपासून शहरातील स्वच्छता सुरू करण्यासाठी सर्वच सफाई कर्मचारी(एकूण आकडा ३७) यांनी हजर व्हावे तसेच शहरातील गटारीचे काम सुरू करण्यात येईल शहरातील कचरा शुक्रवार पासून गोळा करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने अखेर कुलूप ठोकण्याचे आंदोलन माघार घेण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र काळे, शिवसेना तालुकाप्रमुख(उबाठा) दिलीप मचे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू काळे, जेष्ठनेते राजू अहिरे,चंद्रकांत काळे,गजानन चौधरी,कृष्णा जुनघरे,अजय नेरपगारे,आदींनी सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्न वर तोडगा काढून शहरातील सफाई चा प्रश्न मार्गी लावला त्यामुळे शुक्रवारी पासून शहरातील कचरा कोंडी आता दूर होईल.
0 Comments