बाभळेश्वर (वार्ताहर) हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती राहाता तालुक्यातील बाभळेश्वर( दत्तनगर )श्रीरामपूर दुध जिल्हा संघाच्या कार्यस्थळावर, श्री गुरुदत्त मित्र ,शिवगर्जना प्रतिष्ठान व श्रीराम मित्र मंडळ, संयुक्त विद्यमाने मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात केली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास श्रीरामपूर दूध जिल्हा संघाचे चेअरमन सुधीर म्हस्के, पोपट घोलप ,बोधक गुरुजी, यांच्या हस्ते पूजन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आरती करण्यात आली. यावेळी योगेश म्हस्के, बबन चव्हाण पप्पु गाढवे ,उमेश डेरे , बाळासाहेब लोळगे ,प्रकाश औताडे केशव बेंद्रे , महेश बेंद्रे, बाळासाहेब जाधव , एकनाथ गोर्डे , देवराम राठोड, प्रकाश म्हस्के ,संजय करवा सुजित सावंत, रंगनाथ हिवाळे ,निलेश शिंदे ,अनिल शिंदे ,सुनील मावळे ,ईजाज तांबोळी ,विशाल शिंदे, किरण पंडित, शंकर रोकडे, चेतन सोनवणे, आदित्य गायकवाड,राहुल कदम, एकनाथ भागवत,प्रितेश जाधव ,निवृत्ती होले, आदित्य पाटील ,ऋत्विक पाटील, गणेश मावळे ,संकेत मावळे, सतीश गाडेकररवेदांतराजे औताडे, नवनाथ बेंद्रे आदित्य तांबे, मनन पाटील , कृणाल नेरकर ,आर्यन राठोड, रवींद्र कडू ,कृष्णा पाटील ,साई पाटील, .आदी परिसरातील मित्र मंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
0 Comments