राहुरी / प्रतिनिधी : तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील व मूळ साकुरी राहाता येथील रहिवासी अनुज ज्ञानेश्वर बनसोडे याने एमआयटी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आळंदी पुणे या महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त आयोजित भव्य हाॅलीबाॅल स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे.
या महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या क्रीडा स्पर्धेत भव्य हाॅलीबाॅलच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत अनुज ज्ञानेश्वर बनसोडे या विद्यार्थ्याने सदर स्पर्धेचे कप्तानपदाला साजेसा खेळ करत हा अटीतटीचा सामना जिंकला आहे.
अनुज ज्ञानेश्वर बनसोडे हा राहुरी फॅक्टरी सारख्या ग्रामीण भागातील असून एमआयटी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात बीएस्सी अनिमेशन करत आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
0 Comments