राजेश तगरे मित्र मंडळच्या वतीने टाकळीभान व पंचक्रोशीतील पत्रकारांचा मोठा सन्मान



टाकळीभान:- प्रतिनिधी- श्रीरामपूर तालुक्यातील  टाकळीभान येथील राजेश तगरे मित्र मंडळ यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी हॉटेल किंग पॅलेस येथील मीटिंग हॉलमध्ये पत्रकार दिन  सन्मान कार्यक्रमाचे मोठ्या स्वरूपात आयोजन करण्यात आले होते.



            यावेळी छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी सह ,पतसंस्था अहिल्यानगरचे संचालक राजेश तगरे व मित्र मंडळ यांनी पत्रकारांचे स्वागत व सन्मान करून पत्रकार बद्दल आदर, प्रेम व कृतज्ञता व्यक्त केली. पत्रकार हा लोकशाहीचा व समाजाचा खरा आधारस्तंभ असून लोकशाही बळकट करण्याचं महत्त्वाचं काम करत असतो तसेच आपल्या लेखणी द्वारे अन्यायाला वाचा फोडून समाज जनजागृतीचे मोठे काम ही त्याच्या हातून होत असते. पत्रकार बांधवांचा माझ्या जडणघडणीत मोठा वाटा असून माझ्या चांगल्या कामांना नेहमी पत्रकार बांधवांनी वेळोवेळी प्रसिद्धी दिली आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने छोटासा प्रयत्न केला आहे असे राजेश तगरे यावेळी म्हणाले. 
         यावेळी छत्रपती शिवाजी राजे ग्रामपंचायत अधिकारी सह,  संस्था आहिल्यानगरचे संचालक राजेश तगरे, व करण तगरे यांच्या हस्ते  टाकळीभान व परिसरातील पत्रकार बांधवांना बॅग साहित्य, गुलाब पुष्प, श्रीफळ देऊन पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला व पत्रकार बांधवांना स्नेहभोजन देण्यात आले. यावेळी सूत्रसंचालन अर्जुन राऊत यांनी केले तर आभार अशोकराव रणनवरे यांनी मानले.


Post a Comment

0 Comments