दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.04 - सोयगाव तालुक्यातील निंबायती शेती शिवारात मंगळवारी चार वाजता बिबट्याने चक्क रस्त्यावर मुक्तपणे संचार करत मजुरांना दर्शन दिले त्यामुळे दहशत पसरली होती दरम्यान बिबट्या रस्त्यावरून निंबायती शेती शिवारात पलायन केल्याचे.
रस्त्यावर ये जा करणाऱ्या ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी पाहिले दरम्यान जंगल भागातील पाणवठे कोरडी झाल्या मुळे पिण्याच्या पाण्यासाठी बिबट्या शेती शिवारात आला असावा असा अंदाज आहे मात्र हा बिबट्या रात्रभर शेती शिवारात मुक्काम करण्याचाही अंदाज काही शेतकऱ्यांनी वर्तविला आहे वनविभागाने या बिबट्याला तातडीने जेरबंद करावे अशी मागणी होत आहे.
दरम्यान या बिबट्या चे पायाचे ठसे शेतात उमटले असून सदर ठसे मोबाईल मध्ये अनेकांनी कैद केले होते.
0 Comments