खासदार डॉ कल्याण काळे यांच्या दौऱ्यात अधिकाऱ्यांनी फिरविली पाठ, अधिकाऱ्यांमध्ये उदासीनता--



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.24 -खासदार डॉ  कल्याण काळे यांच्या शुक्रवारी सोयगाव तालुक्यातील दौऱ्यात तालुका कृषी अधिकारी वगळता तालुका प्रशासनाचा एकही अधिकारी दौऱ्यात हजर नव्हते त्यामुळे यावरूनच तालुका प्रशासनाची उदासीनता दिसून आली आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागातील दौऱ्यात एकही पोलीस सुरक्षेसाठी नव्हता त्यामुळे विना सुरक्षा खासदार डॉ कल्याण काळे यांनी अकरा गावात दौरा आटोपता घेतला होता.


जनतेच्या मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी खासदार डॉ कल्याण काळे हे शुक्रवारी सोयगाव तालुका दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी हात घालून यावर मार्ग काढणार असल्याचे सांगितले मात्र सर्वसामान्य नागरिकांना महसूल, पंचायत समिती, वन विभाग, आरोग्य, शिक्षण, बांधकाम विभाग, आदी यंत्रणा च्या समस्या खूप होत्या परंतु खासदार यांच्या दौऱ्यात कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी रमेश गुंडीले वगळता एकही अधिकारी उपस्थित नव्हता त्यामुळे आगामी आठवड्यात आढावा बैठक लावण्याचे निर्णय घेण्यात आला तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना तहसील आणि पंचायत समिती विभागाचे अडचणी ना सामोरे जावे लागत असल्याने शुक्रवारी खासदार डॉ कल्याण काळे यांच्या समोर नागरिकांनी त्या विभागाचे अडचणी उपस्थित केल्या होत्या परंतु त्या अडचणी ऐकून घेण्यासाठी यंत्रणा च उपस्थित नव्हत्या त्यामुळे गोंधळ उडाला होता खासदार डॉ कल्याण काळे हे दौऱ्यावर असताना तालुका प्रशासन गैरहजर असणे ही गंभीर बाब आहे यावर काय कारवाई होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


     ---थेट दौऱ्यातून कृषी सह संचालक यांना फोन-
निंबायती गावातील शेतकऱ्यांनी रब्बीच्या पिकविम्या साठी सोयगाव तालुक्यात मका आणि ज्वारीचे क्षेत्र अधिक असून ही पिके रब्बीच्या पिकविम्याच्या अधिसूचित यादीत आलीच नसल्याचे तक्रारी शेतकऱ्यांनी उपस्थित केल्या दरम्यान यावर उपाय योजना करण्यासाठी खासदार डॉ कल्याण काळे यांनी थेट दौऱ्यातून कृषी सह संचालक डॉ तुकाराम मोटे यांना फोन लावुन यामध्ये तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना निंबायती गावातून दिल्या होत्या..

Post a Comment

0 Comments